Connect with us

गोवा खबर

भारतामध्ये मीम्स बनत आहेत विरोध व्यक्त करण्याचे प्रभावी साधन

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतामध्ये मीम्स आता रोजच्या राजकीय अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे माध्यम बनत आहेत. विशेषतः ज्या काळात विरोध व्यक्त करण्यासाठीची जागा कमी होत आहे, त्या काळात तरुण आणि सामान्य नागरिक शासन, विकास, पर्यटन आणि ओळख यांसारख्या मुद्द्यांवर मत मांडण्यासाठीमीम्सचा वापर करत आहेत, असे गोव्यातील डिजिटल संस्कृती संशोधक व लेखिका कविता कबीर यांनी सांगितले.

म्युझियम ऑफ गोवा (मोग), पिळर्ण येथे झालेल्या मोग सन्डे सत्रात बोलताना, ‘कबिरन’ हे डिजिटल व्यासपीठ चालवणाऱ्या कबीर यांनी भारतातील मीम्सचा प्रवास इंटरनेटवरील विनोदापासून व्यापक संवादाच्या माध्यमापर्यंत कसा झाला, या विशयी भाष्य केले. देशभरातीलतसेच गोव्यासारख्या लहान राज्यांतील उदाहरणे देत त्यांनी सांगितले की, मीम तयार करणे हे लोकांसाठी त्यांच्या रोजच्या आयुष्यावर परिणामकरणाऱ्या विषयांवर “चर्चेत सहभागी होण्याचा” एक मार्ग बनले आहे.

पारंपरिक व्यंगचित्रे किंवा मतलेखांप्रमाणे मीम्ससाठी कोणत्याही संस्थेची मान्यता, संपादकीय परवानगी किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज नसते. ही सहज उपलब्धता गोव्यासारख्या ठिकाणी मीम्स अधिक प्रभावी ठरते, कारण येथे निर्माते आणि प्रेक्षक अनेकदा एकमेकांनाओळखतात. “लहान राज्यात लोक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीकडे एकमेकांना ओळखतात. त्यामुळे डिजिटल अभिव्यक्ती अधिकतात्काळ आणि वास्तवाशी जोडलेली वाटते,” असे त्या म्हणाल्या.

या सत्रात गोव्यातील मीम्स कसे खड्डे, पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यटनाचा ताण आणि प्रशासकीय अपयश यांसारख्या दैनंदिन प्रश्नांवर विनोद आणिउपरोधाच्या माध्यमातून भाष्य करतात, यावरही चर्चा झाली. दिसायला हलकेफुलके वाटणारे हे मीम्स प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित अनेक अर्थदडवून ठेवतात, त्यामुळे औपचारिक भाषेचा आधार न घेता टीका मोठ्या प्रमाणावर पोहोचू शकते, असे कबीर यांनी स्पष्ट केले.

भाषा आणि स्थानिक संदर्भ यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. अनेक गोवन मीम्स इंग्रजी, कोंकणी किंवा मराठीत असले तरी, त्यामागीलस्थानिक संदर्भ आणि सामायिक सांस्कृतिक जाणिवा यामुळेच ते प्रभावी ठरतात. “काही विनोद त्यांच्या संदर्भाबाहेर चालतच नाहीत. मीम्सस्थानिक समजुतींवर अवलंबून असतात, आणि त्यातूनच त्यांचा प्रभाव वाढतो,” असे त्या म्हणाल्या.

सध्याच्या डिजिटल वातावरणात विनोदाशी जोडलेल्या जोखमींवरही चर्चा झाली. कबीर यांनी सांगितले की, भारतभरात विनोदी कलाकार, कंटेंटक्रिएटर्स आणि मीम निर्माते यांना टीका, विरोध आणि पाळत यांचा सामना करावा लागत आहे. विनोद कधी कधी संरक्षण देतो, पण तो कायमसुरक्षिततेची हमी देत नाही. “आज तुम्हाला वाटेल की तुमच्या वर नजर नाहीये, पण परिस्थिती फार लवकर बदलू शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.

या चर्चेत सहभागी झालेल्यांनी सांगितले की, मीम्स केवळ विद्यमान मतांचे प्रतिबिंब नसून स्थानिक मुद्द्यांवरील सार्वजनिक चर्चा घडवून आणू शकतात. एखादा मीम वारंवार बदलून आणि शेअर करून पुढे जात असेल, तर तो मुद्दा समाजाच्या सामूहिक भावनेला भिडल्याचे संकेत असतात, खाजगी असंतोष सार्वजनिक टीकेत बदलतो, असे कबीर यांनी स्पष्ट केले.

कबीर यांनी शेवटी नमूद केले की, डिजिटल अभिव्यक्ती प्रभावी असली तरी ती प्रत्यक्ष कृतीची जागा घेऊ शकत नाही. मीम्सकडे प्रत्यक्ष संघटन, चर्चा आणि सहभाग यांचा भाग म्हणून पाहिले पाहिजे विशेषतः गोव्यासारख्या राज्यात, जिथे समाजआधारित कृतीने सार्वजनिक जीवनालानेहमीच दिशा दिली आहे.