गोवा खबर:टाकवाडा-उसगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या ‘विश्वजित राणे चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद ‘मॅच फिक्सिंग कारापूर’ संघाने पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी ‘दत्ता क्लासेस अस्नोडा’ या संघाचा पराभव केला.
विशेष पारितोषिक: ओमकार गावकर (गांजेश्वरी क्रीडा मंडळ, गांजे)
बक्षीस वितरण समारंभात बोलताना मंत्री विश्वजित राणे यांनी उसगावातील क्रीडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लवकरच लोकार्पण होईल, अशी घोषणा केली. तसेच, उसगावात अजून एक क्रीडांगण उभारण्यासाठी कमुनिदादकडे जागा मागितल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उसगाव पंचायत, सत्तरीतील पंचायतींचे प्रतिनिधी आणि वाळपई नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.