गोवा खबर
ऊर्जेचे नवीन युग आता सुरू झाले आहे : श्रीपाद नाईक
Published
2 years agoon
गोवा खबर : भारताने एक नवीन हायड्रोजन धोरण पुढे नेण्यासाठी सामायिक वचनबद्धतेद्वारे चालविलेले ऊर्जा संक्रमण युगात प्रवेश केला आहे, असे हरित हायड्रोजन (आयसीजीएच – २०२४) वरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समापन सत्राला संबोधित करताना, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी अधोरेखित केले.
श्रीपाद नाईक यांनी स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या प्रगतीसाठी सरकारच्या अतूट बांधिलकीवर भर देत, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेला प्रारंभिक खर्च १९ हजार ७४४ कोटी रुपये दिल्याची माहिती दिली. एक व्यापक रणनीती, ज्यामध्ये मागणी निर्माण, उत्पादन,संशोधन आणि विकास, पायाभूत सुविधा, नियामक रचना, आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यांचा समावेश आहे, असे नाईक यांनी ठळकपणे सांगितले. या व्यतिरिक्त, नाईक यांनी युवकांचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की युवकांना आवश्यक कौशल्यांसह सक्षम करून, भारत त्यांना शाश्वत भविष्याचे शिल्पकार होण्यासाठी सुसज्ज करत असल्याचे स्पष्ट केले.
११ – १३ सप्टेंबर २०२४ दरम्यान आयोजित या परिषदेचे उद्घाटन प्रल्हाद जोशी, केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री; ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांनी ८ हजार ५०० हून अधिक प्रतिनिधींना आकर्षित केले, ज्यात तीन हजार पेक्षा जास्त तरुण आणि विद्यार्थी होते. हरित हायड्रोजन क्षेत्रातील नवनवीन शोध, तांत्रिक प्रगती दर्शविणारे प्रदर्शन देखील यात होते. प्रदर्शनात दाखवलेल्या हायड्रोजनवर चालणारी बस आणि हायड्रोजन अंतर्गत ज्वलन इंजिन (एच२आयसीई) चालणाऱ्या ट्रकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
समापन सत्राला संबोधित करताना, प्रा. अजय के. सूद, भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणाले, “हरित हायड्रोजनसाठी आमची वचनबद्धता केवळ उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यापुरती नाही, जे अर्थातच महत्त्वाचे आहे. आपल्या ऊर्जा प्रणालीची पुनर्परिभाषित करून नवीन नोकऱ्या निर्माण करण्याची आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, आरोग्यदायी ग्रह सुरक्षित करण्याच्या ऐतिहासिक संधीचा फायदा घ्यावा.
आपल्या भाषणादरम्यान, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव, भूपिंदर एस. भल्ला यांनी भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हरित हायड्रोजनच्या परिवर्तनीय क्षमतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, हरित हायड्रोजन हा केवळ एक नवीन ऊर्जा स्त्रोत नाही, तर तो भविष्याकडे जाणारा एक मार्ग आहे, जिथे स्वच्छ ऊर्जा हा सर्वसामान्य प्रमाण आहे आणि उद्योगांना कार्बनमुक्त केले जाते. गेल्या तीन दिवसांत, आम्ही धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, यांच्यात कसे सहकार्य होते हे पाहिले. उद्योगातील नेते नवनिर्मिती करून हरित हायड्रोजन धोरण पुढे आणू शकतात. यात महत्वाकांक्षा मजबूत करता येतील, तसेच संधी देखील अफाट आहेत.
भारत सरकारच्या पेट्रोल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांनी हरित हायड्रोजन अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, हरित हायड्रोजन ही केवळ तांत्रिक नवकल्पना पेक्षा अधिक असून ऊर्जेच्या एका नवीन युगाचे प्रतीक आहे, जेथे टिकाऊपणा आर्थिक व्यवहार्यतेची पूर्तता करते. ऊर्जेच्या भविष्यासाठी नवीन विचारांची आवश्यकता आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून ते स्मार्ट व्यवसाय रचना आणि जागतिक सहकार्य, एकत्रितपणे आम्ही शाश्वत वाढ, कमी खर्च आणि सर्वांसाठी स्वच्छ, लवचिक भविष्य निर्माण करण्यासाठी हरित हायड्रोजनची क्षमतेचे कुलूप उघडू शकतो.
फिक्कीच्या महासंचालक ज्योती विज यांनी परिषदे यशस्वी केल्याबद्दल सर्व सहभागी आणि भागधारकांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, आपल्या देशाच्या संक्रमणाच्या उद्दिष्टांसाठी सरकार आणि उद्योग या दोघांकडून एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. फिक्की भारताला हरित हायड्रोजन केंद्र बनवण्यासाठी देशांतर्गत संधी, तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे निर्यात क्षमता आणि निव्वळ शून्याकडे संक्रमण आणि हरित हायड्रोजनचा अवलंब करण्यासाठी वापरकर्ता उद्योगांना समर्थन या दोन्हीसाठी वचनबद्ध आहे.
दिवसात अगोदर, इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव अजय यादव यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहीम पुढे नेण्यासाठी संपूर्ण सरकारी दृष्टिकोनावर भर दिला, त्यांनी अधोरेखित केले की तब्बल १३ राज्य आहेत, ज्यांनी हरित हायड्रोजन परिसंस्थेला समर्थन देण्यासाठी धोरणात्मक तरतुद केली आहे. मोहिमेमुळे ६ लाख हरित नोकऱ्या निर्माण होतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यादव यांनी भारताला हरित हायड्रोजनमध्ये जागतिक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्यासाठी कौशल्य, सुरक्षितता, पथदर्शी प्रकल्प, संशोधन आणि विकास आणि नवकल्पना यांच्या महत्त्वावर भर दिला. हे संक्रमण केवळ उद्दिष्टे पूर्ण करण्यापुरते नाही, तर ते भारताच्या ऊर्जा परिदृश्य आणि आर्थिक भविष्याला आकार देण्याबाबत आहे.
पूर्ण सत्र परिषदेदरम्यान आयोजित केलेल्या सियोन्स मध्ये यूएसए, युरोपियन संघ, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी आणि आयरेनाद्वारे सादर केलेल्या जागतिक दृष्टीकोनातून पुढाकार आणि प्रगती अधोरेखित केली गेली. या सत्रांनी हरित हायड्रोजन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहयोग आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले.
२२ उत्कृष्ट सत्रांमध्ये हरित हायड्रोजनच्या तांत्रिक, आर्थिक आणि धोरणात्मक बाबींचा अभ्यास करण्यात आला. आम्ही इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियांचे ऑप्टिमायझेशन आणि स्वदेशीकरण, स्टोरेज आणि वाहतूक उपाय, संरक्षण क्षेत्रातील अनुप्रयोग आणि बायोमास मार्गांचे एकत्रीकरण शोधले. आम्ही वाहतूक क्षेत्रासाठी हायड्रोजन आधारित इंधनाचे भविष्य, जहाज उद्योग आणि विमानचालनासाठी अखंड एकीकरण, स्टील उत्पादन आणि तेल शुद्धीकरणासाठी हरित हायड्रोजनची व्यवहार्यता यावर चर्चा केली.
परिषदेच्या पहिल्या दिवशी भारताच्या ऊर्जा भविष्याला आकार देऊन आर्थिक विकास आणि टिकाऊपणाला चालना देण्यासाठी हरित हायड्रोजनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला. दुसऱ्या दिवशी सुश्री सायना नेहवाल यांनी तरुण सहभागींना प्रेरणा देत तरुणांच्या सहभागावर प्रकाश टाकला. याव्यतिरिक्त, आयआयटी बॉम्बे मधील नंदलाल गुप्ता यांनी जीएच२थॉन हॅकाथॉन आणि हरित हायड्रोजनमधील नवनवीन शोध प्रदर्शित केलेल्या परस्पर पोस्टर स्पर्धा जिंकली.
तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी, परिषदेने आंतरराष्ट्रीय सहयोग आणि नवोन्मेषासाठी भारताच्या समर्पणावर प्रकाश टाकला. “दी हायड्रोजन चॅलेंज: टेस्ट युअर एलिमेंटल नॉलेज” ही एक आकर्षक प्रश्नमंजुषा, इंडियन ऑइलचे उपमहाव्यवस्थापक दीपक तनेजा यांनी आयोजित केली होती. हरित हायड्रोजन विषयावरील सात फेऱ्यांचा समावेश असलेल्या या प्रश्नमंजुषेमध्ये आयआयटी बॉम्बेचे नंदलाल गुप्ता आणि चंद्रमणी राय विजेते ठरले.
त्यापाठोपाठ आयसीटी मुंबईचे अभिषेक जामदार आणि ओशनिक मौर्य दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर आयआयटी बॉम्बेचे तृष्णा ठाकूर आणि विष्णू टीएस, तर चौथ्या क्रमांकावर ओंज्युबिलंट सर्व्हिसेस लिमिटेडचे विवेक पांचाळ आणि दिपेश पिंपळे राहिले. संवादात्मक प्रश्नमंजुषामध्ये प्रेक्षकांचा सहभाग देखील होता, ज्यामुळे प्रतिनिधींना हरित हायड्रोजन नवकल्पना आणि धोरणांबद्दलची समज वाढली.
याव्यतिरिक्त, पोस्टर स्पर्धेत हरित हायड्रोजन क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधनाचे प्रदर्शन करण्यात आले. विजेत्यांमध्ये आयआयटी बॉम्बेचे कपिल केदार तिरपुडे आणि तृष्णा ठाकूर यांचा समावेश होता. आकाश कुमार बुरोलिया आणि आयआयटी खरगपूरच्या डॉ. स्वाती नियोगी आणि सीएसआयआर – केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल संशोधन संस्था आणि वैज्ञानिक व नाविन्यपूर्ण संशोधन अकादमी अर्द्रा एस दर्शन आणि डॉ. ए मुरुगन यांना पुरस्कार मिळाले.
आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषद (आयसीजीएच – २०२४) च्या या दुसऱ्या आवृत्तीत यूएस अधिकृत भागीदार देश होता.
पेट्रोल आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय आणि भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांचे कार्यालय, हरित हायड्रोजन २०२४ (आयसीजीएच – २०२४) ची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद. भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (एसईसीआय) आणि ईवाय अनुक्रमे अंमलबजावणी आणि ज्ञान भागीदार आहेत, तर फिक्की हे उद्योग भागीदार आहे.
Continue Reading
You may like
-
Guardian Angel SC Stun Goa Police with Hard-Fought Victory
-
कोकणातील गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी जलाशय आणि अमृत सरोवरांचा वापर
-
राष्ट्रपतींची अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिराला भेट; रामलल्लाचे दर्शन
-
मुंबई सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले
-
गोव्यासाठी हवामान इशारा : आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
-
AAP’s Geetesh Naik Appeals Bhandari Samaj To Vote For Someone Who Understands Struggles of a Common Man, and Reject Familyraj
