-
गोव्यात आयोजित ‘फर्स्ट फ्रायडे’मध्ये मिळेल याचे उत्तर
गोवा खबर : आज व्यवसायामध्ये क्रांती घडवण्यापासून ते दैनंदिन दिनचर्या घडवण्यापर्यंत, भू-स्थानिक आणि स्थान तंत्रज्ञान हे जगाशी आपला संवाद कसा साधत आहे, या बदलाची सुरुवात ‘कुठे?’ या साध्या प्रश्नापासून होते. गोव्याच्या सर्जनशील समुदायासोबत होणाऱ्या ‘फर्स्ट फ्रायडे’च्या १६व्या आवृत्तीत, आजच्या तंत्रज्ञान-चालित जगात भू-स्थानिक साधने कशी अपरिहार्य भाग बनत आहेत, याचा सखोल अभ्यास करण्यात आला.
मडगाव येथे को-वर्किंग केंद्र असलेल्या फायर येथे १२ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या सत्राचे आयोजन क्रिएटिव्ह कम्युनिटी ऑफ गोवातर्फे (सीसीजी) असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) – गोवा चॅप्टर व गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीई अँड सी) खात्याच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलच्या सहकार्याने करण्यात आले होते.
या अभ्यासपूर्ण सत्राचे नेतृत्व आर्किटेक्ट आणि उद्योजक विक्रांत करंदीकर यांनी केले, ज्यांनी प्रेक्षकांना भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीपासूनच्या प्रवासावर नेले. त्याच्या लष्करी उत्पत्तीपासून ते जीपीएस, डिलिव्हरी ट्रॅकिंग आणि आरोग्यसेवा निदान यासारख्या दैनंदिन सेवांना सक्षम बनवण्यात आजच्या भूमिकेपर्यंत, त्यांनी या विषयावर माहिती दिली.

या तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना, करंदीकर यांनी स्पष्ट केले, की ‘लोकेशन डेटा’ हा भौतिक भूगोलाच्या पलीकडे जाऊन स्मार्ट निर्णय आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल्सवर प्रभाव पाडण्यामागे एक प्रमुख शक्ती बनला आहे, मग ते फूड डिलिव्हरीसाठी अचूक जागा शोधणे असो किंवा एमआरआय दरम्यान दुखापतीचे स्थान चिन्हांकित करणे असो.
“भू-स्थानिक तंत्रज्ञान आता नकाशांपुरते मर्यादित नाही. आज प्रत्येक व्यवसाय लोकेशन डेटाद्वारे समर्थित आहे,” असे करंदीकर म्हणाले. काऊचसर्फिंग आणि एअरबीएनबी सारख्या स्टार्टअप्सनी खर्च कमी करण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि अधिक वैयक्तिकृत सेवा प्रदान करण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा कसा वापर केला आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी स्विगी, गुगल मॅप्स आणि अमेझॉन या सारख्या अॅप्सवर लाईव्ह फीडबॅक शेअर करून वापरकर्ते भू-स्थानिक परिसंस्थेत कसे सहयोगी बनले आहेत, हे देखील अधोरेखित केले, जिथे क्राउड-सोर्स केलेली मते आणि रिअल-टाइम लोकेशन अपडेट्स व्यवसायाच्या केंद्रस्थानी असतात.

किरकोळ विक्रीशी समांतरता साधताना, करंदीकर यांनी आठवण करून दिली, की शहरी महानगरांमध्ये शॅम्पू विकणाऱ्या ब्रँडना स्थानिक खरेदी क्षमतेवर आधारून २ आणि १० रुपयांच्या सॅशेमध्ये शॅम्पू पुन्हा पॅक करावे लागत होते, जे स्थान-जागरूक उत्पादन धोरणाचे एक प्रारंभिक उदाहरण आहे.
शहरी वाहतुकीबद्दल बोलताना, त्यांनी टेस्लाच्या एडीएएस, ई-सिम असलेल्या कनेक्टेड कार आणि उबर व ओला सारख्या प्लॅटफॉर्मचा उल्लेख करून एसेस मॉडेल (स्वायत्त, जोडणी, इलेक्ट्रिक, शेअर्ड) अधोरेखित केले, ज्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये कार मालकी पर्यायी बनली आहे.
संवर्धनाच्या आघाडीवर माहिती देताना करंदीकर यांनी, कर्नाटकातील गेंड्यांच्या अधिवासाचा मागोवा घेणारे ड्रोन आणि वारसा स्थळांसाठी थ्रीडी मॅपिंगचा वापर, स्थानिक दस्तऐवजीकरणाद्वारे भारताच्या सांस्कृतिक फॅब्रिकचे जतन करण्याबद्दल सांगितले. त्यांनी क्रीडा तंत्रज्ञानाचाही उल्लेख केला, जिथे एम्बेडेड गायरोस्कोप असलेले स्मार्ट बॅट आता स्विंग डायनॅमिक्सचे विश्लेषण करतात आणि रिअल-टाइम कामगिरीचा अभिप्राय देतात.
या कार्यक्रमाने प्रेक्षकांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत काय दुर्लक्षित होऊ शकते याची एक झलक दाखवली. तसेच प्रत्येक गोष्टीत स्थानाची लपलेली भूमिका जसे कि जीआयएस टूल्स वापरून बांधकाम डिझाइन (उदा. रिलेशनल डेटासह ऑटोकॅड), अचूक मार्ग मॅपिंगसह लॉजिस्टिक्स ऑप्टिमायझेशन आणि एसएमएसद्वारे पूर किंवा चक्रीवादळाच्या चेतावणीसारख्या भू-स्थानिक सूचनांद्वारे आपत्ती प्रतिसाद याविषयी माहिती दिली.
या सत्राने जागा, माहिती आणि तंत्रज्ञान कसे खोलवर जोडलेले आहेत, याची पुनर्कल्पना करण्याची एक मौल्यवान संधी दिली. जसे की स्थान-आधारित सेवांनी अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या तंत्रज्ञान दिग्गजांच्या धोरणांना कसा आकार दिला आहे, याबद्दल या सत्रात मार्गदर्शन मिळाले.
या सर्जनशील व्यावसायिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना, स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचे सीईओ श्री डी. एस. प्रशांत यांनी गोवा राज्य केवळ समुद्रकिनारी गंतव्यस्थान राहिलेले नसून प्रीमियम टेक इनोव्हेशनचे केंद्र म्हणून कसे विकसित होत आहे, यावर प्रकाश टाकला.
गोवा हे एक असे राज्य आहे, जिथे उत्पादने तयार करण्यासाठी प्रतिभा एकत्र येते. गोवा राज्य सर्जनशीलतेला पोषण देते तसेच नाविन्यपूर्णतेसाठी आवश्यक असलेली पुरेशी जागा आणि स्वातंत्र्य देते, असे त्यांनी नमूद केले. तसेच निर्मात्यांना एकत्र येऊन गोव्याला भारताची सर्जनशील राजधानी बनवण्याचे आवाहन केले.
गोव्याच्या सर्जनशील परिसंस्थेत डिझाइन, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेचे मिश्रण सुरू असताना, ‘फर्स्ट फ्रायडे’ सारखे कार्यक्रम प्रेरणा मिळविण्याचे शक्तिशाली केंद्र बनत आहेत. असे कार्यक्रम शिकण्यासाठी, नेटवर्किंगसाठी आणि चांगले भविष्य घडविण्यासाठी तसेच कल्पनांना प्रज्वलित करण्यासाठी एक अद्वितीय जागा प्रदान करतात.