गोवा खबर : रायगड हा शिवाजी महाराजांचा उल्लेखनीय वारसा, संरक्षण रणनीतीची अलौकिक बुद्धिमत्ता आणि नेतृत्वाचा दाखला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडाचा गौरव केला.
यंदाच्या राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात रायगडाला मानाचे स्थान देण्यात आल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे ,“रायगड म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या महानतेचा आणि शौर्याचा दाखला असून साहस आणि निर्भयतेचे दुसरे नाव आहे.
यंदाच्या राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाने रायगडला मानाचे स्थान दिले,यांचा मला अतिशय आनंद होत आहे.”