Connect with us

गोवा खबर

केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकांची घोषणा

Published

on

Spread the love

गोवा खबर : विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय पोलीस संघटना, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यातील 463 कर्मचाऱ्यांना 2024 या वर्षी देण्यात येणाऱ्या‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकांची घोषणा  करण्यात आली आहे.

आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील चार क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी/अधिकाऱ्याचे मनोबल वाढवण्यासाठी, पुढील विभागात ही पदके प्रदान केली जातात :

(i) विशेष मोहीम

(ii) तपास

(iii) गोपनीय माहिती

(iv) न्यायवैद्यकशास्त्र

‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकांची घोषणा दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे  करण्यात आली आहे. ही पदके कार्यवाही करत असताना बजावलेल्या उत्कृष्ट सेवा, तपासातील उत्कृष्ट सेवा, लक्षणीय कामगिरी,  दुर्दम्य आणि धाडसी कार्य,असीम बुद्धिमत्ता,याबद्दल राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या विशेष शाखेतील सदस्य,पोलिस दल, सुरक्षा संघटना, गुप्तचर शाखा/ इतर शाखा/, केंद्रीय पोलिस संघटना/केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी)/आसाम रायफल्स आणि न्यायवैद्यक शास्त्र,विज्ञानसेवा या क्षेत्रातील गुणवंत सरकारी शास्त्रज्ञ तसेच  कर्मचाऱ्यांना प्रदान केली जाणार आहेत.

या पदकांची घोषणा दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केली जाते.