श्रीगुरुतत्त्वाचा एक हजारपटीने लाभ करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमेत सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन
गोवा खबर: हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादी काळापासून चालू आहे. गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा एक हजारपटीने कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ समाजाला घेता यावा, यांसाठी या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने २१ जुलै २०२४ या दिवशी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम्, आदी भाषांमध्ये देशभरात ७५ ठिकाणी तर गोव्यात ६ ठिकाणी होणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.

प्राचीन काळापासून राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच ‘गुरु-शिष्य’ परंपरेने केले आहे. सध्याही समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा वेळी जनतेचा छळ करणार्या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि ‘रामराज्या’सारख्या ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे ही काळानुसार सर्वोत्तम श्रीगुरुसेवाच आहे. यांसाठी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे.
गोव्यात श्री सिद्धपुरुष नारायणदेव सभागृह, काणका बांध, म्हापसा (सायंकाळी ५ ते ७ वा.); संत गाडगे बाबा सभागृह, पुंडलिक नगर, पर्वरी (सायंकाळी ५ ते ७ वा.); डेलमोन सभागृह, साखळी (सायंकाळी ५ ते ७ वा.); श्री नवदुर्गा सभागृह, बोरी, फोंडा (सायंकाळी ५ ते ७ वा.); एक्ट (ACT) हॉल्स, स्टेट बँकेच्या वर, बोल्शे प्लाजा, बोल्शे, बिग फूट चौक जवळ, घोगळ, मडगाव (सायंकाळी ५ ते ७ वा.) आणि जी.एम्.सेलिब्रेशन हॉल, श्रीस्थळ, काणकोण (सायंकाळी ४ ते ६ वा.)
ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ आयोजित करण्यात केले आहेत. २१ जुलैला मराठी भाषेतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ पुढील मार्गीकेवर घेता येईल. https://www.sanatan.org/mr/gurupurnima