Connect with us

क्रीडा खबर

यंदाची एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन होणार ११ डिसेंबर रोजी

Published

on

Spread the love

 

वुमन रन वर्ल्डही यावर्षीच्या मॅरेथॉनची थीम आहे

गोवा खबर:  यंदाची एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन होणार रविवार ११ डिसेंबर रोजी होणार आहे. चिखली, वास्को दि गामा येथे होणाऱ्या १२ व्या एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये महिला धावपटू केंद्रस्थानी असणार आहेत.

शनिवारी शहरात आयोजित एका पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना, वास्को स्पोर्ट्स क्लबचे (व्हीएससी) आणि कार्यक्रमाचे प्रवर्तक अध्यक्ष नितीन बांदेकर म्हणाले की, “आम्ही सामाजिक सामावेशतेचे  महत्त्व वाढविण्यासाठी “वुमन रन द वर्ल्ड” ही थीम सुरू केली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशभरातील सर्व वयोगटातील महिला धावपटू आणि चालणाऱ्यांचा समावेश आणि स्वागत आहे. आम्ही नोंदणी करणाऱ्या महिलांसाठी 15 टक्के सवलत देत आहोत . तसेच यावर्षापासून  प्रथमच महिला आणि पुरुष धावपटूंच्या बक्षिसाची रक्कम समान असेल.”

हे सलग दुसरे वर्ष आहे ज्यात, एसकेएफ इंडिया ही आघाडीची बेअरिंग उत्पादक कंपनी गोवा रिव्हर मॅरेथॉन (जीआरएम) सोबत या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.वास्को स्पोर्ट्स क्लब (व्हीएससी) द्वारे प्रोत्साहन दिलेला हा कार्यक्रम चिखली पंचायतीच्या मैदानावर सुरू होईल आणि तिथेचसमाप्त होईल . मॅरेथॉन ४२ किमी (पूर्ण मॅरेथॉन), २१ किमी (हाफ मॅरेथॉन) आणि १० किमी शर्यत अशा तीन स्पर्धात्मक श्रेणींमध्ये आयोजित केला जाईल. शर्यतीची नोंदणी आधीच सुरू झाली आहे . धावपटू www.skfgoarivermarathon.com या वेबसाइटवर ‘एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन’साठी नोंदणी करू शकतात.

एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर म्हणाले की “आम्ही पुन्हा एकदा शीर्षक प्रायोजक म्हणून गोवा रिव्हर मॅरेथॉनला पाठिंबा देण्यासाठी उत्साहित आहोत. “वुमन रन द वर्ल्ड” ही थीम सामाजिक समावेशकतेला प्रोत्साहन देण्याची आणि विविध सहभागींना धावण्याच्या खेळात आकर्षित करण्याची एक उत्तम संधी आहे.”

 

वास्को स्पोर्ट्स क्लबचे सचिव राकेश उन्नी म्हणाले की”‘वुमन रन द वर्ल्ड” या थीम अंतर्गत, आम्ही अधिक न्याय्य आणि सर्वसमावेशक धावणाऱ्यांची कम्युनिटी तयार करण्यात योगदान देण्यासाठी उत्सुक आहोत.”

नोंदणीची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२२ आहे.