Connect with us

गोवा खबर

एफसी गोवाला आयएसएल हंगामाची झोकात सुरुवात करणार्‍या कार्लोस पेना, इडु बेडियाचे चाहत्यांकडून कौतुक

Published

on

Spread the love

 

गोवा खबर: आयएसएल 2022-23 हंगामाची झोकात सुरुवात करणारे एफसी गोवाचे  माजी डिफेंडर मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना आणि सलामीच्या विजयाचा हिरो इडु बेडिया याचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

 

एफसी गोवा संघाला प्रत्यक्ष मैदानावर खेळताना पाहणे आश्चर्यकारक होते. खेळाडूंना कौशल्यपूर्ण पद्धतीने बॉल एक्सचेंज करताना पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि काही वेळातच आमच्या कर्णधाराने गोल केला. मी सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला. यावेळी योग्य भरती करण्यात आली असे म्हटले पाहिजे, एफसी गोवा फॅन क्लबचे मेब्लिश म्हणाले.

 

सहकारी गौर मारियानो पुढे म्हणाले, प्रशिक्षक कार्लोस यांच्या नेतृत्वाखाली, हा संघ या हंगामात नक्कीच काहीतरी मोठे साध्य करू शकेल.

 

जोएड आल्मेडा, जे गोवन रेसिडेंट आयकॉन आणि इंडिगो म्युझिकमधील रेडिओ जॉकी यांनीही सीझन-ओपनरपासून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुरुवातीला मी अस्वस्थ होतो. मात्र, पहिलाच सामना एक रोमांचकारी ठरला. इडु बेडिया हा शेवटच्या मिनिटापर्यंत जिंकण्याच्या इराद्याने खेळला. सांघिक खेळाच्या जोरावर ईस्ट बंगालला हरवून आम्ही महत्त्वपूर्ण तीन गुण आपल्या नावे केले, अशी त्याने टिप्पणी केली.

 

माजी बचावपटू कार्लोस पेना हे यंदाच्या समरमध्ये एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जॉइन झाले. एका नव्या भूमिकेत एक माजी खेळाडू संघात दाखल झाल्याने पेना यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. 38 वर्षीय पेना हे काही वर्षांपूर्वी गौर्सच्या हीरो आयएसएल आणि शील्ड विजेत्या संघाचे अविभाज्य भाग होता. 2019मध्ये एफसी गोवाला सुपर कप जिंकून देण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.

 

पेना यांच्या खेळाप्रति डेडिकेशनबद्दल जाणून घ्या. त्यांच्या नियुक्तीमुळे चाहत्यांमध्ये सावध आशावाद निर्माण झाला. बुधवारी ईस्ट बंगाल एफसी विरुद्धच्या मोसमातील सलामीच्या सामन्यात गौर्सचे उत्साही प्रदर्शन आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती यामुळे चाहत्यांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

 

प्रत्येक सामन्यात आम्ही विजयासाठी खेळू, असे वचन पेना यांनी चाहत्यांना दिले आहे. बुधवारी, कोलकाता येथे ब्रँडन फर्नांडिसच्या सुरुवातीच्या स्ट्राइकने – क्लबचा कर्णधार म्हणूनही तो पहिलाच – त्याच्या प्रशिक्षकाचे शब्द खरे असल्याचे सिद्ध केले.

 

आणि आता, येत्या काही आठवड्यांमध्ये असे आणखी थरार अनुभवण्यासाठी चाहते आतुर आहेत.

 

बेडियाचे अधिक कौतुक

2017-18 हंगामापासून गौर्स संघाचा भाग असलेल्या इडू बेडियाने शेवटच्या क्षणी केलेल्या स्ट्राइकमुळे हिरो आयएसएलमधील 88 सामन्यांमध्ये त्याची वैयक्तिक गोलसंख्या 11 वर नेली. ईस्ट बंगाल विरुद्ध, स्पॅनियार्डने पुन्हा एकदा दाखवून दिले की, तो क्लबसाठी अपरिहार्य का आहे. मॅन-ऑफ-द-मॅच कामगिरीसह त्याने सामना संपायला काही सेकंद आधीचा विजयी गोल देखील समाविष्ट होता.

 

शेवटच्या क्षणीचा तो गोल अप्रतिम होता. हंगामाची सुरुवात धडाकेबाज झाल्याने खूप आनंद झाला. बेडिया याच्या करारात वाढ केल्याचा सकारात्मक परिणाम जाणवला. बुधवारी त्याने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली, असे मारियानो म्हणाला.

 

सामंथा या एफसी गोवाच्या आणखी एका चाहतीने  निदर्शनास आणून दिले की, इडु याचा तो गोल हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम आहे. त्याचे बाकीचे सेट-पीस देखील उल्लेखास पात्र आहेत. किमान दोन गोल आणि सहाय्य करून तो ड्रेसिंग रूममध्ये परतला असता, असे मत तिने व्यक्त केले.

 

विजय आणि तीन गुण असूनही, दोन वेळा आयएसएलच्या अंतिम फेरीत खेळलेल्या खेळाडूंना बरीच सुधारणा आवश्यक आहे, यावर एफसी गोवा फॅन क्लबच्या ओंकारने लक्ष वेधले.

 

मोसमाची सुरुवात विजयाने करणे ही खरोखरच एक आश्चर्यकारक भावना आहे. पहिल्या हाफमध्ये आम्ही सकारात्मक सुरुवात केली आणि सामनाही दमदारपणे संपवला. अजून बरेच सामने खेळायचे आहेत. सातत्य राखण्याचे मोठे आव्हान आहे – उदाहरणार्थ, प्रतिस्पर्धी संघ आक्रमक मूडमध्ये असतो त्यावेळी आमचा संघ थोडा असुरक्षित वाटतो. मात्र, पुढील सामन्यांत आमचा संघ त्यात सुधारणा करण्यावर भर देईल, अशी मला खात्री आहे.

 

प्रत्येक सामन्यागणिक सुधारणेला वाव असतो. मात्र, एफसी गोवा संघ घरच्या मैदानावर खेळेल तेव्हा फातोर्डा किल्ल्यावर सुधारित बाजू पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत. तिथे संघाला संपूर्णपणे पाठिंबा देउ, असा  निष्कर्ष त्याने काढला.