Connect with us

गोवा खबर

 बिले डिजिटल पद्धतीने भरावी : पीडब्ल्यूडी चे ग्राहकांना आवाहन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:सार्वजनिक बांधकाम खात्याने  (पीडब्ल्यूडी) सीवरेज असलेल्या/सीवरेज  जोडणी नसलेल्या पाणीपुरवठा ग्राहकांना, डिजिटल पद्धतीने बिले भरण्याचे आवाहन केले आहे. पीडब्ल्यूडी ने भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस) कार्यान्वित केली आहे आणि आता कोणत्याही युपीआय सक्षम अॅपवर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पाणी बिल सहज भरता येइल.

ग्राहकांना नियुक्त बँकांमध्ये (उपलब्ध बँकांची यादी https://pwd.goa.gov.in वर आहे ) पाणी पुरवठा बिल भरण्याचा पर्याय देखील आहे. त्याशिवाय क्यूआर  कोड सुविधेद्वारे पेमेंट स्वीकारले जाऊ शकते, आरटीजीएस/एनइएफटी किंवा goaonline.gov.in द्वारे भरलेली बिले देखील स्वीकारली जातील.

विलंब पेमेंट शुल्क आणि जोडणी खंडित होणे  टाळण्यासाठी, ग्राहकांनी पाणी बिलाची सर्व थकबाकी त्वरित भरावी, अशी विनंती करण्यात आली आहे. २ महिन्यांहून अधिक काळ देय असलेली सर्व पाणी जोडणी, खंडित होण्यास पात्र आहेत. थकबाकी आणि पुनजोडणी शुल्क भरल्यानंतरच पाणी जोडणी पुन्हा मिळू शकेल. जोडणी खंडित केल्यानंतर पुन्हा जोडणी हि, १ वर्षाच्या आतच मिळू शकते. सर्व थकबाकीदार ग्राहकांचे पाणी कनेक्शन तात्काळ तोडण्यात येणार आहे. विभागाकडून नोटीस आणि अंतिम बिल जारी केले जाईल आणि त्यानंतर कायदा/अधिसूचने नुसार कारवाई सुरू केली जाईल.

पीडब्ल्यूडी ने पुढे सूचित केले आहे, की देय तारखेच्या आत बिल न भरल्यास आणि गेल्या २ महिन्यांपासून पैसे न भरल्यास जोडणी खंडित केली जाईल. तसेच जोडणी खंडित केलेल्या तारखेपासून १ वर्षाच्या कालावधीत थकबाकी, लागू शुल्क इत्यादी भरल्यानंतरच पुन्हा जोडणी दिली जाईल. अशा सर्व डिफॉल्ट ग्राहकांसाठी, पाणी पुरवठा खंडित केला जाईल. खात्याकडून नोटीस आणि अंतिम बिल देखील जारी केले जाईल आणि ज्या ग्राहकांची थकबाकी न भरल्यामुळे आधीच पाणी कनेक्शन खंडित केले आहे, अशा ग्राहकांसह कायद्यानुसार/अधीसूचनेनुसार कारवाई सुरू केली जाईल.

घरगुती श्रेणीतील पाण्याचे कनेक्शन असलेले ग्राहक, हे पाणी बिगर घरगुती वापरासाठी वापरत असल्याचेही पीडब्ल्यूडीच्या निदर्शनास आले आहे. अशा सर्व ग्राहकांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे, की त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी पीडब्ल्यूडी द्वारे जारी केलेल्या लागू दरपत्रक आणि अधिसूचनेनुसार, योग्य श्रेणीमध्ये पाणी जोडणी बदलण्यासाठी ताबडतोब संबंधित पाणीपुरवठा उपविभागाशी संपर्क साधावा. असे न केल्यास, पीडब्ल्यूडी कडून ग्राहकांना कोणतीही औपचारिक विनंती/अर्ज न देता, योग्य श्रेणीसाठी पाणी जोडणी बदलण्याची कार्यवाही सुरू करेल.

मीटर जोडणी असलेले ग्राहक किंवा ज्यांचे पाणी जोडणी खंडित केले आहे, ते पाणी जोडणीशी छेडछाड करताना किंवा वितरण नेटवर्कमधून पाणी काढण्यासाठी अनधिकृत/बेकायदेशीर मार्ग वापरताना आढळल्यास किंवा थेट सेवा पाइपलाइनवर पंप वापरताना आढळल्यास, त्यांच्याकडून कायद्यानुसार/अधिसूचनेनुसार दंड आकारला जाईल आणि पाणीपुरवठा खंडित होण्यासही ते पात्र असतील.