Connect with us

गोवा खबर

अभाविप सांखळी महाविद्यालय कार्यकारणी घोषित

Published

on

Spread the love

गोवा खबर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवा विभागाने आपले सरकारी महाविद्यालय सांखळी युनिट घोषित केले. यावेळी अभाविप गोवा विभाग संघटन मंत्री गोविंद देशपांडे, कोंकण प्रांत सहमंत्री अवधूत कोटकर, कोंकण प्रांत कार्यकारणी सदस्य सुदिप नाईक, डिचोली समिती प्रमुख आकाश नाईक व इतर उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. माधव देसाई- अध्यक्ष, फैज शेख- उपाध्यक्ष, सन्मयी गावस- मंत्री, निरज शेट्ये- सहमंत्री, दीपराणी च्यारी- कला मंच प्रमुख, निधी घोगळे- विद्यार्थीनी प्रमुख, करुणा गावस- विद्यार्थीनी सहप्रमुख, एन मारिया बायजूस- कार्यालय प्रमुख, यशवंत च्यारी- क्रीडा प्रमुख, रिया कळंगुटकर- सोशल मीडिया प्रमुख, अनुज राणे- बीकॉम फॅकल्टी प्रमुख, प्रणय देसाई- बीएससी फॅकल्टी प्रमुख, रुद्रेश नाईक- बीए फॅकल्टी प्रमुख तसेच कार्यकारणी सदस्य- प्रवीण जेम्स, दत्तराज चणेकर, राकेश मल्लपूर, दुर्वा सुखटणकर व सुदिप नाईक.

विद्यार्थी परिषद महाविद्यालय आणि विद्यार्थी समुदायाच्या चांगल्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करेल असे यावेळी बोलताना आकाश नाईक म्हणाले. विद्यार्थ्यांच्या सगळ्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत, नविन कार्यकारणी खूप छान काम करणार अशी आशा अवधूत कोटकर यांनी यावेळी व्यक्त केली.