Connect with us

गोवा खबर

हिरो मोटोकॉर्पकडून देशातील अद्वितीय टॅलेण्‍ट हंट – ‘हिरो डर्ट बाइकिंग चॅलेंज’ लाँच

Published

on

Spread the love

 

  • देशव्यापी स्पर्धा बाइकिंग उत्साही हौशींना त्यांचे टॅलेण् दाखवण्यासाठी बहुप्रतिक्षित व्यासपीठ देणार
  • विजेत्यांना एक्सपल् २०० ४व्ही आणि स्पॉन्सरशिप करार मिळणार

गोवा खबर:आपल्‍या ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनाला अधिक दृढ करत आणि देशातील तरूणांना योग्‍य व्‍यासपीठ देत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने आज ओईएमद्वारे (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्‍युफॅक्‍चुरर) भारतभरातील अद्वितीय टॅलेण्हंट प्रोग्रामहिरो डर्ट बाइकिंग चॅलेंज (एचडीबीसी)ची घोषणा केली.

हिरो डर्ट बाइकिंग चॅलेंजचा ऑफ-रोड रेसिंगमध्‍ये आपली आवड पूर्ण करण्‍याची आणि क्षेत्रात स्‍वत:चे नावलौकिक करण्‍याची इच्‍छा असलेले उदयोन्‍मुख राइडर्स, उत्‍साही व हौशींसाठी बहुप्रतिक्षित व्‍यासपीठ देण्‍याचा मनसुबा आहे.

देशाच्‍या कानाकोप-यापर्यंत विस्‍तारित करण्‍यासह या स्‍पर्धेला देशव्‍यापी करत एचडीबीसी भारतातील अव्‍वल हौशी ऑफ-रोड राइडर्सचा शोध घेण्‍यासाठी जवळपास ४५ शहरांपर्यंत पोहोचेल. विजेता व दोन उपविजेत्‍यांना हिरो मोटोकॉर्पकडून लोकप्रिय हिरो एक्सपल् २०० ४व्ही मोटरसायकल आणि २० लाख रूपयांचे स्पॉन्सरशिप् करार मिळतील.

तसेच तरूणांमध्‍ये आपली लोकप्रियता वाढवत एचडीबीसीचे प्रसारण एमटीव्हीवर करण्‍यात येईल आणि नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये वूटवर स्ट्रिमिंग करण्‍यात येईल.

आज याबाबत घोषणा करत हिरो मोटोकॉर्पचे चीफ ग्रोथ ऑफिसर (सीजीओ) रणजीवजीत सिंग म्‍हणाले, हिरो मोटोस्‍पोर्टस् टीम रॅली ही हिरो मोटोकॉर्पची रॅलीरेसिंग टीम आंतरराष्‍ट्रीय रॅली रेसिंगमध्‍ये भारताची ध्‍वज-वाहक राहिली आहे आणि आम्‍ही आता एचडीबीसीच्‍या माध्‍यमातून भारतातील तरूणांना मार्गदर्शन करण्‍यासाठी या कौशल्‍याला घेऊन येत आहोत. यामुळे देशातील ऑफ-रोड संस्‍कृतीला अधिक चालना मिळेल. हिरो एक्‍सप्‍लस २०० ४व्ही मुळे आता तरूणांना ऑफ-रोड राइडिंगमधील त्‍यांची आवड पूर्ण करण्‍यासाठी पर्याय उपलब्ध होत आहे. मला विश्‍वास आहे की, देशातील हा अद्वितीय उपक्रम राइडिंग उत्‍साहींना नवीन संधी देईल आणि भारताला त्‍यांचे भावी चॅम्पियन्‍स देईल. आम्‍ही सर्व सहभागींना हार्दिक शुभेच्‍छा देतो.

एचडीबीसीच्या सहभागींना अव्वल आंतरराष्ट्रीय टीम्सपैकी एक आणि डकार रॅलीमध्ये एक टप्पा जिंकणारी आतापर्यंतची एकमेव भारतीय टीम हिरो मोटोस्पोर्टस टीम रॅलीकडून प्रशिक्षण मिळण्याची सुवर्णसंधी मिळेल. हिरो मोटोस्पोर्टस टीम रॅलीचे राइडर्स रोस ब्रांच, जॅक्विम रॉड्रिग्, सेबेस्टियन बुहलर आणि फ्रँको कैमी अव्वल सहभागींसोबत काम करतील आणि त्यांना बहुमूल् प्रशिक्षण देतील.

नोंदणीसाठी आणि हिरो डर्ट बाइकिंग चॅलेंजबाबत अधिक माहितीसाठी इच्‍छुक सहभागी www.hdbc.in येथे लॉग ऑन करू शकतात.

ऑनलाइन सबमिशन्‍सच्‍या स्क्रिनिंगनंतर ४५ शहरांमध्‍ये विविध वीकेण्‍ड्सना प्रथम फे-या आयोजित करण्‍यात येतील आणि या फेरीमधील शॉर्ट‍लिस्‍ट करण्‍यात आलेले सहभागी प्रादेशिक फे-यांकडे वाटचाल करतील, ज्‍या १८ शहरांमध्‍ये आयोजित करण्‍यात येतील.

अव्‍वल १०० निवडण्‍यात आलेले राइडर्स पाच-दिवसीय प्रादेशिक बूटकॅम्‍पमध्‍ये जातील, जेथे त्‍यांना दिग्‍गज भारतीय राइडर सीएस संतोष यांच्‍याकडून प्रशिक्षण मिळण्‍याची आणखी एक सुवर्णसंधी मिळेल.

रेससह बूटकॅम्‍पचे समापन होईल आणि त्‍यानंतर अव्‍वल २० सहभागी जयपूरमधील हिरो मोटोकॉर्पचे अत्‍याधुनिेक आरअॅण्‍डडी सेंटर जागतिक दर्जाचे सेंटर ऑफ इनोव्‍हेशन ऑफ टेक्‍नोलॉजी (सीआयटी) येथे आयोजित करण्‍यात येणा-या फायनल्‍सकडे वाटचाल करतील.

सीआयटीमध्‍ये अव्‍वल राइडर्सना प्रतिष्ठित बक्षीसासाठी अंतिम विजेत्‍याची निवड करण्‍यासाठी फायनल रेसपूर्वी पाच दिवस मोटोस्‍पोर्टस् टीम रॅलीकडून प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळेल.