Connect with us

गोवा खबर

आयएचसीएलतर्फे गोवा जीटीडीसी निवासस्थानांमध्ये प्रशिक्षण सत्राचे यशस्वी आयोजन

Published

on

Spread the love

 

 ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर, गोवा येथे आदरातिथ्य सेवेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

गोवा खबर: गोव्यातील पर्यटनासाठी सेवा क्षेत्रात मैलाचा दगड साध्य करत ,इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड(आयएचसीएल) ने गोवा पर्यटन विकास महामंडळ लिमिटेड (जीटीडीसी) निवासस्थानातील कर्मचार्‍यांसाठी पूर्ण दिवस प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे प्रशिक्षण ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर, दोना पावला येथे पार पडले . प्रशिक्षणामध्ये आयएचसीएलतर्फे केल्या जाणाऱ्या अद्वितीय आदरातिथ्याची माहिती देण्यात आली.

तसेच आयएचसीएलच्या लर्निंग अँड डेव्हलपमेंट टीम सोबत वेगाने विकसित होत असलेल्या उद्योगाच्या सध्याच्या कल आणि संभाव्य शिकण्याबद्दलचे संवादात्मक सत्रही आयोजित केले गेले. प्रशिक्षणार्थीची निवड त्यांच्या अनुभवाच्या आधारावर करण्यात आली होती. या सत्रात हाऊसकीपिंग, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, फूड अँड बेव्हरेज प्रोडक्शन, फ्रंट ऑफिस, इंजिनिअरिंग आणि हॉर्टिकल्चर यासह गृह विभागांचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला.

प्रत्येक विभागाच्या प्रमुखाने दररोज हॉटेल ऑपरेशन्समध्ये वापरल्या जाणार्‍या विविध तंत्रे आणि कौशल्यांचे प्रात्यक्षिक दिले. त्यांनी प्रभावी वेळ व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक उपकरणांचा योग्य वापर कसा करावा याबद्दल माहिती दिली. याशिवाय, प्रत्येक विभागाने त्यांच्यासमोरील सामाईक आव्हाने आणि त्या सोडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींबद्दल चर्चा केली.

या उपक्रमाबाबत बोलताना, आयएचसीएलचे गोवाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. व्हिन्सेंट रामोस म्हणाले की, “देशातील इतर राज्यांच्या विपरीत, पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे . यावर ४०% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. त्यामुळे, बदलत्या पर्यटन क्षेत्राशी जुळवून घेणे आणि आजच्या पर्यटकांच्या सेवा अपेक्षांशी जुळवून घेणे अत्यावश्यक आहे. गोव्यामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट प्रवास व विश्रांतीचे ठिकाण म्हणून अव्वल स्थान मिळवण्याची क्षमता आहे. पर्यटन उद्योगातील सर्व भागीदार आणि भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नाने  गोवा पर्यटनात अनुकरणीय दर्जा प्राप्त करू शकेल अशी मला खात्री आहे.”

 

 

 

 

 

प्रशिक्षण पूर्ण केल्यावर, सहभागींना जीटीडीसीच्या वरिष्ठ नेतृत्व संघाकडून प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले. समारोप समारंभात आपल्या भाषणात जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर म्हणाले की,  “जीटीडीसी रेसिडेन्सीजमधील सेवा मानके वाढवण्यासाठी त्यांचे संसाधने आणि समर्थन पुरवल्याबद्दल आम्ही आयएचसीएल टीमचे अत्यंत आभारी आहोत. निःसंशयपणे, आयएचसीएल हे भारतीय आदरातिथ्याचे वैशिष्ट्य आहे . त्यांनी आपली सेवा संस्कृती ११८ वर्षांपासून जगभरातील ५० स्थळांवर जपली गेली . या समन्वयामुळे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेनुसार गोवा एक आदर्श राज्य बनण्यास मदत होईल.”

 

जीटीडीसीकडे संपूर्ण राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी ५०० पेक्षा जास्त आस्थापने आहेत. यांचा वापर प्रामुख्याने देशभरातून गोव्याच्या भेट देणाऱ्या प्रवाश्यांसाठी केला जातो.