गोवा खबर:कुंकळी येथील बंडाच्या नायकांना आदरांजली वाहण्यासाठी १५ जुलै रोजी नायक हुतात्मा दिवस” पाळण्यात येईल. कुंकळ्ळी येथील नायक स्मारकाजवळ सकाळी ८.३० वाजता कार्यक्रम सुरू होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री, आमदार आणि इतर मान्यवर नायक स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील.
१५ जुलै १५८३ रोजी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध शूर गोमंतकीयांच्या पहिल्या बंडाची आठवण म्हणून राज्य सरकारतर्फे दरवर्षी १५ जुलै हा नायक हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो.