Connect with us

गोवा खबर

‘मेन विल बी मेन’, ‘इन टू द सी’ आणि ‘टुगेदर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मिफ्फ संवादमध्ये माध्यम प्रतिनिधींशी साधला संवाद

Published

on

Spread the love



‘इन टू द सी’ चित्रपटाचे वादळात चित्रीकरण करणे अतिशय कठीण अनुभव- दिग्दर्शक आशिष नायक

 



गोवा खबर:सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फ मध्ये ‘मेन विल बी मेन’, ‘इन टू  द सी’ आणि ‘टुगेदर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आज पत्रकार परिषदेत आपल्या चित्रपटांचा प्रवास उलगडून सांगितला.

 

‘मेन विल बी मेन’ हा पति-पत्नी संबंधांवर आधारित सिनेमा आहे. कितीही अडचणी असो, हसत रहा असा संदेश यातून दिल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक कुमार चंद्र सेखराम म्हणाले. गेल्या लॉकडाऊनमध्ये लोणावळा-मुंबई प्रवासात याचे चित्रीकरण केले आहे. चित्रपटाचा नायक आणि गाडीचा ड्रायव्हर या दोघांचा एकाच दिवशी लग्नाचा वाढदिवस असतो. प्रवासादरम्यान दोघांच्या पत्नीचा फोन येतो,  ड्रायव्हर पत्नीशी खरे बोलतो तर नायक खोटे बोलतो. यातून पुढे घडलेल्या घटना पडद्यावर पाहणे रंजक ठरेल.

‘इन टू  द सी’ उडिया भाषेतील सिनेमा आहे. समुद्रात चक्रीवादळ केव्हाही धडकते. किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसून मोठ्या प्रमाणावर हानी होते. देशाच्या इतर भागातील लोकांना त्याची कल्पना नसते. असे इन टू  द सी चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष नायक म्हणाले. वादळी वाऱ्यातही समुद्रात जाऊन मासेमारी करणाऱ्यांचे भावविश्व यात दाखवले आहे. वादळात चित्रीकरण करणे अतिशय कठीण होते. समुद्रातून बाहेर आल्यावरही आम्ही हेलकावे खात होतो असे ते म्हणाले.

 

‘टुगेदर’ हा 22 मिनिटांचा लघुपट आहे. कोविड  महामारीच्या दुसऱ्या लाटेची याला पार्श्वभूमी आहे. कोविड काळातील भावनिक चढउतार यात दाखवण्यात आल्याचे दिग्दर्शक आझाद आलम म्हणाले. दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (न्यूयॉर्क) आणि न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये याचा प्रीमियर झाला आहे.