गोवा खबर:युनिव्हर्सिटी सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर स्कूल ऑफ फिजिकल अँड अप्लाइड सायन्स येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन विषयातील बॅचलर ऑफ व्होकेशनल (B.Voc.) अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी गोवा विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रवेशासाठीचे अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अभ्यासक्रम प्रवेशासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची कोणत्याही शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी गोवा विद्यापिठाच्या www.unigoa.ac.in वेबसाईटला भेट द्यावी.

अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२२ अशी आहे. गोवा विद्यापिठातील युनिव्हर्सिटी सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन सेंटरमध्ये १५ जून २०२२ रोजी अभियोग्यता मूल्यांकन / मुलाखत होणार आहे. १७ जून २०२२ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल आणि २० जून २०२२ पासून अभ्यासक्रमास सुरूवात होईल.
प्रवेश पुर्णपणे बारावीच्या एकूण ४०% गुणांच्या आणि योग्यता मूल्यांकन/मुलाखतीच्या ६०% गुणांच्या आधारावर तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल.
अधिक माहितीसाठी ईमेल आयडी: vetrekarnarayan@unigoa.ac.in , मोबाईल क्रमांक: 7030965974 / 8669609219 / 9423211264 वर संपर्क साधावा.