Connect with us

गोवा खबर

तुम्ही नाकारू शकत नाही असा प्रस्ताव; मिफ्फपासून इफ्फीपर्यंत

Published

on

Spread the love


 

 

 

”आणि हे सर्व सुंदर वातावरण स्वर्ग असू शकत नाही त्यामुळे माझा मनाला हे चांगले ठाऊक आहे, हा जून आहे.” – अबा  वूलसन

गोवा खबर:ओहो ! जून सुरू झाला,  उन्हाळ्याची सुट्टी संपली म्हणून नाराज होऊ  नका. तुमची सुट्टी संपूच नये, तुम्हाला अविरत  चित्रपटांचा आनंद घेता यावा, हीच  17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचीसुद्धा  (MIFF) इच्छा आहे.

 

 

तुमचे शब्द तुम्हाला क्रूझवर गोव्याला नेऊ  शकतात !

पर्यटन मंत्रालय, पश्चिम विभाग कार्यालय, मुंबई  आणि फिल्म्स डिविजन, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तुमच्यातील चित्रपटरसिक आणि लेखकाला सन्मानित  करण्याचे मार्ग शोधत आहेत. जर तुम्ही चित्रपटप्रेमी असाल आणि चांगल्या चित्रपटांना आणि चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन मिळायला हवे, असे तुम्हाला वाटत असेल – तर हा प्रस्ताव  तुमच्यासाठी आहे. या स्पर्धेतील विजेत्याला कॉर्डेलियाच्या मुंबई-गोवा-मुंबई क्रूझ प्रवासाचे तिकीट मिळेल.

 

#MyMIFFLove

सहभागी कसे व्हावे?

सोपे आहे. मिफ्फ 2022 मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत दाखवण्यात आलेल्या  कोणत्याही चित्रपटावरील समीक्षेद्वारे चित्रपटांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करा. मिफ्फ  2022 मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रकारात एकूण 119 नॉन फीचर फिल्म्स जसे की.  माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपट दाखवण्यात येत आहेत. मोठ्या पडद्यावर हे चित्रपट पाहण्यासाठी आणि चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधण्यासाठी त्वरित https://miff.in/ वर नोंदणी करा.

तुम्ही हायब्रीड मोड अंतर्गत विनामूल्य नोंदणी करून चित्रपट ऑनलाइन देखील पाहू शकता. नोंदणीला आता सुरुवात झाली आहे.

7 जून 12 च्या मध्यरात्री (11:59:59 PM) पर्यंत चित्रपट ऑनलाइन पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

MIFF-2022 मधील कोणत्या चित्रपटांमुळे तुमच्या काळजाचा ठोका चुकला ? तुमच्या ब्लॉगवर लिहून आणि प्रकाशित करून आणि तुमच्या लेखाची/रिव्ह्यूची  लिंक आम्हाला पाठवून तुमच्या आवडत्या मिफ्फ चित्रपटांबद्दल जगाला देखील कळू द्या.

अटी व शर्ती:

कृपया तुमच्‍या प्रवेशिका miffcontest@gmail.com वर 10 जून 2022 पूर्वी मेल करा.

  1. लेखाची लांबी 300-500 शब्दांच्या दरम्यान असावी
  2. लेखन मूळ स्वरूपात असावे. दुसऱ्याच्या कल्पना स्वतःच्या नावे पाठवू नये.
  3. कृपया वर्ड आणि पीडीएफ स्वरूपात प्रवेशिका पाठवा.
  4. आम्‍ही तुम्‍हाला लिखित आशय सामग्री सोशल मीडियावर शेअर करण्‍यासाठी आणि #AnythingForFilms आणि #MIFF2022 या हॅशटॅगसह इंडिया टुरिझम मुंबई, पीआयबी इंडिया आणि फिल्म्स डिव्हिजन हँडलला टॅग करण्यासाठी  प्रोत्साहित करतो.
  5. तुम्हाला बक्षीस मिळवून देणारी ऑफर  म्हणजे मुंबई – गोवा – मुंबई  27 नोव्हेंबर 2022 पर्यंत वैध आहे, जेणेकरून तुम्ही गोव्यातील 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहू शकता.

हे तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका जे तुमच्या गोव्याच्या योजना नेहमी हाणून पाडतात !

म्हणूनच MIFF मध्ये 30 देशांच्या चित्रपटांचा आनंद लुटा, तुमच्या आवडत्या चित्रपटाबद्दल लिहा आणि आजच गोव्यासाठी नियोजन सुरु करा.

पॅकिंगला आधीच सुरुवात केली आहे, गोवा साद घालतंय.