Connect with us

गोवा खबर

नाल्यांचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई:शिरोडकर

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर:जलसंसाधन मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये असे आवाहन केले आहे. राज्यातील निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्याचे सांगून राज्यातील नाल्यांचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

कुशावती ते दवर्ली आणि दवर्ली ते वेर्णा ही अतिरिक्त पाईपलाईन हे दोन प्रकल्प या भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी संसाधनमंत्र्यांचा प्राधान्याने हाती घेण्याचा विचार आहे असे त्यांनी नमूद केले.

 शिरोडकर यांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये आयडीसीचे अध्यक्ष श्री आलेक्सो रेजिनाल्ड लॉरेन्सो आणि डब्ल्यूआरडी अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली. त्यांनी वेर्णा येथील आयएफबी आणि सिपला या दोन प्रकल्पाना भेट दिली आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली.

शिरोडकर यांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील काही प्रकल्पामध्ये जलसंचय प्रकल्प सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले जे अत्यंत प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अधिकाधिक प्रकल्पानी पुढे यावे आणि अशा पद्धतींचे पालन केले पाहिजे असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना  शिरोडकर यांनी जलसंचय प्रक्रियेचा उल्लेख करून ही आत्मनिर्भर प्रक्रियेपैकी एक सुंदर प्रक्रिया असल्याचे सांगितले. नैसर्गिक संसाधनांचे जतन करून दैनंदिन वापरासाठी त्याचा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले.

पाण्याच्या टंचाईबद्दल प्रसारमाध्यमांना उत्तर देताना संसाधनमंत्र्यांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीला भेट देण्याचा त्यांचा मुख्य उद्देश टंचाईची कारणे शोधणे आणि जाणून घेणे असा आहे जे खात्यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर काळजी घेतली जाईल असे मंत्री म्हणाले.

 

आयएफबी प्रकल्पाचे प्रमुख श्री पवन कौल आणि सिपलाचे साईट प्रमुख श्री संजय मिश्रा आणि श्री पंकज शितोळे यांनी मंत्री आणि आयडीसी अध्यक्षांचे स्वागत केले.