Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून उद्योगपतीना समस्या सोडविण्याचे आश्वासन

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील उद्योगपतींना खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या गोव्यातील लोकांना नोकरीची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन करीत त्यांना कुशल कार्यबळ उपलब्ध करून देण्याचे आणि खाजगी क्षेत्रातील लोकांसाठी सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. तुमच्या समस्या आम्ही १०० % सोडवू असे डॉ सावंत यांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या बैठकीत सांगितले.

यावेळी मुख्य सचिव, श्री पुनीत कुमार, आयएएस, वीज सचिव, श्री वायव्हीव्हीजे राजशेखर, आयएएस पर्यटन सचिव, श्री रवी धवन, आयएएस , उद्योग सचिव,, श्री सी. आर. गर्ग, आयएएस, जीआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, श्री. वेनान्सियो फुर्ताडो, जीसीसीआयचे  अध्यक्ष श्री राल्फ डीसौझा, उपाध्यक्ष श्रीनिवास धेंम्पो आणि इतर प्रमुख उद्योगपती उपस्थित होते. यावेळी गोव्यातील औद्योगिक क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

“आम्ही आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर गोव्याच्या स्वयंपूर्ण गोव्याचे व्हिजन पुढे चालू ठेवत आहोत.  मुख्यमंत्री म्हणाले की गोव्यात उद्योग वाढले तर राज्याला मोठा फायदा होईल. तक्रार निवारण समिती स्थापन केल्याने भविष्यात सरकार आणि उद्योग यांच्यातील समस्या सोडविण्यात कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्यात मदत होईल असेही ते म्हणाले.

डॉ.सावंत यांनी औद्योगिक क्षेत्रात अजूनही सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गोव्यात अडथळ्यांशिवाय व्यवसाय करणे सुलभ व्हावे असेही ते म्हणाले आणि तेलंगणाच्या नुकत्याच भेटीत ते तेलंगणाच्या औद्योगिक मॉडेलने प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले आणि तो गोव्यात लागू करण्याचा विचार करीत आहेत. त्यांनी गोव्यातील उद्योगधंद्यांकडे आवश्यक माहिती मागविली.

“राज्यात प्रदूषण न करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्याला गोव्याची ताकद ओळखण्याची गरज आहे असे  डॉ सावंत म्हणाले आणि ते म्हणजे आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्र. इथून आपण वैद्यकीय पर्यटन इत्यादींचा वाव शोधू शकतो. आपल्याला पर्यटन क्षेत्रामध्ये नवनवीन गोष्टी आणण्याची गरज आहे आणि पर्यटनाचा भरभराट व्हायचा असेल तर टॅक्सीसारख्या दीर्घकालीन समस्या सोडवायला हव्यात असे ते म्हणाले.  डॉ. सावंत यांनी ब्लू इकॉनॉमी आणि शिक्षण क्षेत्रावर भर देण्याची गरज व्यक्त केली.

रोजगार निर्मितीच्या गरजेवर भर देताना डॉ. सावंत यांनी जीसीसीआयने नवीन उद्योगपतींना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यासाठी सरकार मदत करण्यास तयार आहे असे सांगितले. भाजीपाला, दुग्ध व्यवसाय इत्यादींच्या खरेदीतून बराच महसूल राज्याबाहेर जातो जो आपण आपल्या गोव्यातील शेतकरी आणि उद्योजकांना पुरेशा प्रमाणात प्रेरित केल्यास देऊ शकतो असे ते म्हणाले.