Connect with us

गोवा खबर

गूगलवर कोंकणी भाषांतरासाठी दिलेल्या योगदाना बद्दल हेगडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Published

on

Spread the love
 गोवा खबर:गुगलमध्ये  काम करणारे केपे येथील भूमीपुत्र संजीत हेगडे देसाई यांच्यामुळे गुगलवरील अनुवाद सेवेत कोकणी उपलब्ध होण्याचे स्वप्न अखेर साकारले आहे.याची दखल घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज संजीत हेगडे देसाई यांचा सत्कार केला. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते.
देसाई यांनीच कोकणीचा हा प्रस्ताव गुगलच्या व्यवस्थापन मंडळासमोर ठेवला होता. जो आज प्रत्यक्षात आला आहे. यामुळे गोव्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. केपे येथील प्रसिद्ध अशा हेगडे देसाई घराण्यातील संजीत हे ‘भारतकार’ गोविंद पुंडलीक हेगडे देसाई यांचे नातू असून ते व्यवसाया निमित्त अमेरिकेत स्थाईक झाले आहेत. 2013 मध्ये गुगलमध्ये सामील होण्यापूर्वी ते ओर्कल व एसेंच्यर मध्ये होते.
गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोकणी भाषेचाही समावेश झाला आहे. याशिवाय 24 नव्या भाषांचा समावेश झाल्याची माहिती गुगलने दिली. यामध्ये 8 भारतीय भाषा आहेत. आसामी, भोजपुरी, संस्कृत, डोंगरी, मैथिली, मणिपुरी आणि मिझो या भाषाही ट्रान्सलेटमध्ये असतील. मध्यभारतात जवळपास 20 लाख लोक कोकणी भाषेचा वापर करतात. त्यामुळे गुगलने कोंकणी भाषेचा समावेश केलेला आहे