गोवा खबर: गणेश बर्वे यांनी आज माहिती व प्रसिद्धी खात्याचे संयुक्त संचालक म्हणून पदभार स्वीकारला. उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी – २ म्हणून बदली झालेले खात्याचे माजी संयुक्त संचालक श्री केदार नाईक यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला. माहिती संचालक दिपक बांदेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

सहाय्यक माहिती अधिकारी किरण मुनानकर, शांतो नाईक, श्याम गावकर माहिती सहाय्यक सिद्धेश सामंत, गोविंद गावकर यावेळी उपस्थित होते.
बर्वे यांनी यापूर्वी काणकोण आणि फोंडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि दक्षिण वन सेटलमेंट अधिकारी म्हणून काम केले आहे.