Connect with us

गोवा खबर

देशसेवेत तरुणांनी योगदान द्यावे : दामू नाईक

Published

on

Spread the love
  • डिचोली येथे ‘नशामुक्त भारत नमो रन’मध्ये ३३०० युवकांचा सहभाग

गोवा खबर : भारत आज जगात वैभवाच्या शिखरावर पोहोचला असला तरी काँग्रेस खोटे आरोप करून समाजात विष पसरवते. अशा वेळी तरुणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करून नशामुक्त भारत घडवण्यासाठी पुढे यायला हवे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.

डिचोलीत भाजप युवा मोर्चातर्फे वाळशी येथे ‘नशामुक्त भारत नमो रन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या धावस्पर्धेत तब्बल ३३०० युवक-युवतींसह नागरिकांनीही सहभाग घेतला.

या कार्यक्रमास खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, आमदार चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, भाजप नेते दयानंद कार्बोटकर, तुषार केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वतः पाच किलोमीटर धावून तंदुरुस्तीचे उदाहरण घालून दिले. दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि एका गर्भवती महिलेनेही यात सहभाग घेतला.

दामू नाईक म्हणाले, नमो रनच्या माध्यमातून युवांना व जनतेला नशेपासून दूर ठेवत खऱ्या अर्थाने भारतमातेची सेवा करण्याची प्रेरणा दिली जात आहे.