Connect with us

गोवा खबर

द. गोव्यात दहा दिवसांत ७० लाखांचा गांजा जप्त

Published

on

Spread the love
  • पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांची माहिती

गोवा खबर : दक्षिण गोव्यात गेल्या दहा दिवसांत पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाईचा जोर वाढवत तब्बल आठ ठिकाणी छापे घालून अंदाजे ७० लाख रुपयांचा, सुमारे ७ किलो गांजा जप्त केला आहे.

सोमवारी (दि.२२) पत्रकार परिषदेत बोलताना दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी सांगितले की, राज्यातील कोणत्याही गावात किंवा शहरात अमली पदार्थ तस्करी, विक्री आणि सेवन सहन केले जाणार नाही. पोलिस सतत अशा छापेमाऱ्या करीत राहतील.

अलीकडे वास्को येथे तिघांना गांजासह रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर तपास पुढे नेत पोलिसांनी त्यांना गांजा पुरवणाऱ्या मुख्य संशयिताला ओडिशामध्ये जाऊन अटक केली आणि मोठ्या गांजा रॅकेटचा पर्दाफाश केला. याशिवाय मडगाव, फातोर्डा आदी भागांत केलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला.

एकूण आठ ठिकाणी केलेल्या छाप्यांमध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला, असेही अधीक्षक वर्मा यांनी सांगितले.