Connect with us

गोवा खबर

भाजप युवा मोर्चातर्फे २१ रोजी ‘नमो युवा रन’

Published

on

Spread the love

गोवा खबर : भाजप युवा मोर्चा गोवातर्फे २१ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता डिचोली येथे ‘नमो युवा रन’चे आयोजन करण्यात आले आहे. वाळवे पेन सर्कलपासून डिचोली बसस्थानकापर्यंत ५ किलोमीटर धावण्याची ही स्पर्धा होणार आहे.

भाजयुमो अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी सांगितले की हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा एक भाग असून “नशामुक्त भारत” या संकल्पनेचा प्रसार करणे व युवकांमध्ये तंदुरुस्तीची जाणीव निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.

ही स्पर्धा पाच गटांत होणार असून ५ ते ६० वर्षांवरील नागरिक व विशेषतः दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र गट आहे. सर्व नोंदणी मोफत आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार असून स्थानिक आमदार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.