गोवा खबर : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठा बदल झाला. ४१ पैकी २८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता अध्यक्षपदासाठी महेश देसाई आणि महेश कांदोळकर यांच्यात थेट लढत होणार आहे.
१६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतदानात १०७ क्लब सहभागी होणार असून, १३ उमेदवार रिंगणात आहेत. देसाई यांना चेतन देसाई-बाळू फडके पॅनलचा पाठिंबा आहे तर कांदोळकरांना रोहन गावस देसाई यांचे समर्थन आहे.
क्रिकेट वर्तुळात दोन्ही गटांचा दबदबा असून, एकीकडे देसाई पॅनलकडे मोठा अनुभव आहे तर दुसरीकडे कांदोळकर गटाला बीसीसीआयमधील मोठ्या पदाचा आणि राजकीय पाठिंब्याचा फायदा मिळत आहे. त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.