गोवा खबर : अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी रात्री कळंगुट आणि बागा परिसरात मोठी कारवाई केली. यावेळी २०० किलो निकृष्ट दर्जाचा काजू जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर गोवा बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या मोहिमेत ४ दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, कांदोळीतील एका व्यावसायिकाचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
- नुट्टीम फॅक्टरीवर ५० हजार रुपयांचा दंड
- राजेश चव्हाण यांचे युनिट बंद
- पर्रा येथील टिफिन पुरवठा युनिट अस्वच्छतेमुळे बंद
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, लेनीन डिसा यांच्यासह संदीप शेळके, प्रदीप पार्सेकर आदींनी सहभाग घेतला. प्रशासनाच्या या कारवाईने अन्नसुरक्षा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.