Connect with us

गोवा खबर

रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य : दिगंबर कामत यांची ग्वाही

Published

on

Spread the love

गोवा खबर : तब्बल १३ वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

कामत म्हणाले, अभियंत्यांकडून रस्त्यांची स्थिती जाणून घेतल्यानंतर अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडे तयार केले जातील. खड्डे भरणे आणि आवश्यक दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाईल.

कक्षप्रवेशानंतर देवपूजन करून पत्रकारांशी बोलताना कामत यांनी, पूर्वी वीजमंत्री असताना जसे नियोजनबद्ध धोरण आखले होते तसेच आता सार्वजनिक बांधकाम विभागातही सुसुत्रता आणणार असल्याचे सांगितले.