गोवा खबर : पीओपीच्या गणेशमूर्तीवर लगेच १०० टक्के बंदी घालणे शक्य नाही. मात्र यंदा ५० टक्के बंदी लागू केली असून पुढील वर्षी हा आकडा ७० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे, असे गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, मूर्तिकारांना पुरेसा वेळ आणि साधने दिल्याशिवाय पूर्ण बंदी लागू होणार नाही. सरकार मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देत असून पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने पीओपीला पूर्णविराम देण्याचे धोरण आखले आहे.
गणेशोत्सव काळात पीओपी मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी लोकांनीही सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.