गोवा खबर : राज्यातील ४० टक्के लोकसंख्येला दररोज १८ तासांपेक्षा जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरवले असून, हे लक्ष्य पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
सध्या ४५ टक्के लोकांना रोज ८ तास तर २४ टक्के ग्राहकांना २४ तास पाणी मिळते. फक्त ९ टक्के लोकांना दिवसाला ४ तासांपेक्षा कमी वेळ पाणी मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ५६० पाणी टाक्यांवर ८०० ते ९०० प्रवाह मीटर बसवण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे गळतीवर नियंत्रण ठेवता येईल. सध्या ४० टक्के पाणी गळतीत वाया जात असल्याची धक्कादायक बाबही त्यांनी मांडली.
पुढील १५ दिवसांत पाणीपुरवठा सुधारणा यावर सविस्तर अहवाल तयार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.