Connect with us

गोवा खबर

कामाक्षी ओव्हरसीज कन्सल्टंट्सकडून गोव्यातील विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये तीन वर्षांची पगारी इंडस्ट्री अप्रेंटिसशिप करण्याची संधी

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील 46 विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटी, गॅस्ट्रोनॉमी, बेकर व बुचर, सुतारकाम (कारपेन्ट्री) आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांत करिअर घडवू पहाणाऱ्यांना आता जर्मनीत तीन वर्षांच्या आकर्षक अप्रेंटिसशिप प्रोग्रामद्वारे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि त्याचबरोबर स्टायपेंड मिळवण्याची संधी मिळणार आहे.

हा अभ्यासक्रम साधारणतः 2 ते 3.5 वर्षांचा (क्षेत्रानुसार) असणार आहे. German Ausbildung Programme आणि मडगावस्थित कामाक्षी ओव्हरसीज कन्सल्टंट्स (KOC) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबवण्यात येणारा हा ट्रेन-अँड-अर्न उपक्रम विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम करत शिकण्याची तसेच जर्मनीतील Berufsschule या पार्ट-टाईम व्यावसायिक शाळेत शिकण्याची संधी देणार आहे.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना एकाच वेळी हॉस्पिटॅलिटी, आरोग्यसेवा (नर्सिंग, वृद्धांची देखभाल), गॅस्ट्रोनॉमी, बेकर व बुचर तसेच कारपेन्ट्री ह्या क्षेत्रात उद्योग प्रशिक्षण आणि शिक्षण मिळणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना दरमहा साधारण €850 ते €1,200 (रकमेतील फरक उद्योग व नियोक्त्यांनुसार) इतके मानधन मिळणार आहे.

“भारतीय युवकांसाठी Ausbildung Programme हा केवळ करिअरचा मार्ग नाही, तर जीवन बदलणारा अनुभव आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना कौशल्य, शिस्त आणि विविध कामाच्या संस्कृतींमध्ये टिकून राहण्याची क्षमता देतो, ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने जागतिक नागरिक बनतात. कामाक्षी समूहामध्ये आम्हाला या सशक्तीकरणाच्या प्रवासात भाग घेण्याचा अभिमान वाटतो,” असे कामाक्षी समूहाचे संस्थापक परिक्षित पै फोंडेकर यांनी सांगितले.

कामाक्षी ओव्हरसीज कन्सल्टंट्स (KOC)  त्यांच्या गोव्यातील कॅम्पसवर केवळ ऑफलाईन जर्मन भाषेचे वर्ग घेतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर्मनीत पोहोचल्यावर व्हिसा प्रक्रिया आणि जर्मनीतील राहण्याची सोय यामध्येही मदत करतात. बारावी उत्तीर्ण असलेले, जर्मन भाषेचे B1-लेव्हल प्रमाणपत्र असलेले आणि व्होकेशनल ट्रेनिंग करायची इच्छा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना जर्मन सरकारकडून संपूर्ण युरोपमध्ये मान्यताप्राप्त कौशल्य प्रमाणपत्र मिळते. एवढेच नव्हे तर, विद्यार्थी जर्मनीत आणखी दोन वर्षे काम करून पर्मनंट रेसिडेन्सी साठी देखील अर्ज करू शकतात. हा कार्यक्रम फेडरल कायद्यांनुसार व उद्योग मानकांनुसार चालतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना सखोल शिक्षण व अधिकृत प्रमाणपत्र मिळते.

ज्या विद्यार्थ्यांना German Ausbildung Programme साठी अर्ज करायचा आहे, त्यांनी www.kamaxi.com या संकेतस्थळावर आपले रेज्युमे (सर्व पात्रता व अनुभवासह) अपलोड करून नोंदणी करावी.