Connect with us

गोवा खबर

उघड्यावर कचरा टाकणे थांबवा : मुख्यमंत्र्यांचा कंपन्यांना इशारा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणारा धोकादायक कचरा हा गंभीर प्रश्न ठरत आहे. ‘स्वच्छ गोवा, हरित गोवा’ या ध्येयाकडे वाटचाल करताना यावर कठोर पावले उचलली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत फोंडा एन्व्होकेअर लिमिटेडच्या औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, आता पुढे उघड्यावर धोकादायक कचरा टाकणाऱ्या कंपन्यांवर सरकार कठोर कारवाई करणार आहे.

या प्रकल्पामुळे राज्यातील विविध औद्योगिक वसाहतीत निर्माण होणाऱ्या घातक घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाऊ शकते. तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. दिव्या राणे, कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर, पद्मश्री डॉ. शरद काळे, राज्यसभेचे माजी खासदार अजय संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार डॉ. दिव्या राणे यांनीही या प्रकल्पाचा परिसराला फायदा होईल असे सांगितले. मात्र कंपनीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. लवकरच कंपनी व्यवस्थापन आणि पंचायत मंडळ यांच्यात संवाद साधून समन्वय साधला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.