Connect with us

गोवा खबर

कला – संस्कृती खात्याची माटोळी व देखावा स्पर्धा

Published

on

Spread the love

गोवा खबर:कला व संस्कृती संचालनालयाच्यावतीने दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य स्तरीय माटोळी आणि देखावा स्पर्धा जाहीर झाली आहे. वैयक्तिक कुटुंबासाठी माटोळी सजावट स्पर्धा २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयोजित करण्यात येईल. तर देखावा स्पर्धा गोवा राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी २ ते ६ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात येईल. स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षिसे देण्यात येतील.

या स्पर्धेचे अर्ज कला आणि संस्कृती संचालनालय संस्कृती भवन पाटो, पणजी-गोवा, दूरध्वनी क्र. ०८३२- २४०४६४०/ ६३६ /६३८,  रविंद्र भवन – मडगाव, रविंद्र भवन – कुडचडे, रविंद्र भवन – साखळी, रविंद्र भवन – बायणा- वास्को, रविंद्र भवन –काणकोण व राजीव गांधी कला मंदीर, फोंडा येथे ४ ऑगस्ट २०२५ पासून उपलब्ध असतील. पूर्ण भरलेले अर्ज दिनांक १८ ऑगस्ट २०२५  पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. हे अर्ज कला आणि संस्कृती संचालनालयाच्या www.artandculture.goagov.inया संकेत स्थळावर उपलब्ध असतील. स्पर्धेचे नियम व इतर माहिती अर्ज नमुन्यात नमुद केलेली आहे.