Connect with us

गोवा खबर

क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे स्वातंत्र्य दिनी रोड रेसचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सकाळी ९.३० वाजता रोड रेसचे आयोजन केले आहे.

ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी रोड रेसची सुरवात जुन्या सचिवालयाकडून होईल ३ वयोगटांमध्ये स्पर्धा होणार आहे- पहिला वर्ग १६ वर्षाखालील मुले आणि मुली, (स्पर्धकाचा जन्म १५ ऑगस्ट २००९ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.) त्यांच्यासाठी जुने सचिवालय ते आयनॉक्स व परत, दुसरा वर्ग १९ वर्षाखालील मुले आणि मुली, (स्पर्धकाचा जन्म १५ ऑगस्ट २००६ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.) त्यांच्यासाठी जुने सचिवालय ते कला अकादमी आणि परत आणि तिसरा खुला गट सर्व पुरूष आणि महिला आणि त्यांच्यासाठी जुने सचिवालय ते मिरामार सर्कल आणि परत, अशी धावण्याची स्पर्धा असेल. स्पर्धकांनी नावनोंदणी आणि चेस्ट क्रमांक मिळविण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता पणजी जुन्या सचिवालयाजवळ हजर रहावे.

       या रोड रेसमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी  https://forms.gle/kaPoZ7jMsKY4FY7z6 वर भेट देऊन गुगल प्रवेशिका भरावी. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट अशी आहे. अधिक माहितीसाठी एपीईओ श्री. राजू पवार, मो. क्र. ८४०८०९१०६९ आणि श्री. प्रकाश के. सतरकर, मो. क्र. ९८२३२६९०८८  यांच्याकडे संपर्क साधावा.