Connect with us

गोवा खबर

सरकार जमीन बळकावत नाही : मुख्यमंत्री सावंत यांचे स्पष्टीकरण

Published

on

Spread the love

गोवा खबर : सरकार कोणाच्याही जमिनी बळकावण्याच्या हेतूने कार्यरत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. वारसा नसलेल्या मालमत्तांवरून झालेल्या वादात त्यांनी स्पष्ट केले की, अशा मालमत्तांबाबत विधेयक केवळ जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी आणले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, राज्यातील भू-बळकाव प्रकरणांत आतापर्यंत २२ गुन्हे नोंदवले गेले असून, ७५ संशयितांना अटक झाली आहे. यामध्ये सहा सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये आरोपपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.

जर या विधेयकाला कुणाला आक्षेप असेल, तर त्यांनी न्यायालयात आव्हान द्यावे, असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केले.