Connect with us

गोवा खबर

एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याबद्दल कासारवर्णे येथील अल्पिता नाईकचे सर्वत्र कौतुक

Published

on

Spread the love

गोवा खबर : पेडणे तालुक्यातील कासारवर्णे गावातील अनंत व अक्षया नाईक यांची कन्या अल्पिता कठीण परिस्थितीवर मात करत एमबीबीएस परिक्षा उत्तीर्ण झाली. तिच्या या यशामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

लहानपणापासूनच अल्पिता अत्यंत हुशार. नृत्य, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन तिने अनेक पारितोषिक सुद्धा मिळवलेली आहेत. दहावीत जवाहरलाल नवोदय विद्यालयात ती प्रथम आली होती. अगदी लहान वयात डॉक्टर होण्याची जिद्द मनी बाळगून तिने ध्येय आणि चिकाटी मनी बाळगून आपले लक्ष साध्य केले. तिच्या वडिलांची इच्छा तिने डॉक्टर बनून पूर्ण केली.

चांदेल सरपंच तुलसीदास गवस, कासारवर्णे सरपंच अवनी गाड, उपसरपंच साक्षी नाईक यांनी  तिची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.