Connect with us

गोवा खबर

गोवा होईल सनातन धर्माची राजधानी : आरोग्यमंत्री राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : सनातन धर्माची पुनर्स्थापना गोव्याहून होईल. गोवा ही सनातन धर्माची राजधानी बनावी, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. केरी-सत्तरी व वाळपई येथे झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

मंत्री राणे म्हणाले, सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार गोव्याच्या मातीतून व्हावा. सत्तरी तालुका आणि उसगाव हे या चळवळीचे केंद्र ठरतील. त्यांनी केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकाचे स्वागत करत गोव्याचा त्याला पाठिंबा असल्याचे सांगितले.

या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, आमदार डॉ. दिव्या राणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.