Connect with us

गोवा खबर

पक्षासाठी एकदिलाने कार्य करा : भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक

Published

on

Spread the love

गोवा खबर : पक्षासाठी जुने-नवे असा भेदभाव न करता एकदिलाने काम करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले.

वाळपई येथे आयोजित पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यांनी गरिबांपर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. कार्यकर्त्यांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पक्ष वाढीसाठी कार्य करावे.

आरोग्यमंत्री राणे म्हणाले, नाईक हे तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढविण्याचे काम करत आहेत. आगामी काळात पक्ष आणखी बळकट होईल.

कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाईक यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि संस्थापक नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.