Connect with us

गोवा खबर

महाकुंभ मेळ्यात सुविहित प्रवासासाठी रेल्वे मंत्रालयाचे कार्य जारी

Published

on

Spread the love

गोवा खबर : सध्याच्या महाकुंभमेळ्यासाठी प्रवाशांची अखंड गर्दी असूनही भारतीय रेल्वे प्रवाशांना सुखरूपपणे आणण्यासाठी आणि त्यांच्या मुक्कामी  पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर कार्य करत आहे. एका दिवसापूर्वी माध्यमात आलेल्या एका चुकीच्या वृत्ताचे  खंडन करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांवरून देशाला माहिती दिली  की प्रयागराज परिसरातील आठ वेगवेगळ्या स्थानकांवरून सुमारे 330 रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून 12 लाख 50 हजार प्रवाशांना त्यांच्या मुक्कामी सुखरूप पोहोचवण्यात आले. तरीही गर्दी ओसरत नसल्याचे पाहून पवित्र स्नान करून आलेल्या भाविकांना अधिक वेळ प्रतीक्षा करायला लागू नये यासाठी भारतीय रेल्वेने या स्थानकांवरून चार मिनिटांनंतर एक  रेल्वे गाडी रवाना केली.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी क्षेत्रीय आणि विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या  परिस्थितीचा आढावा घेतला तसेच रेल्वेने आपल्या कार्यक्षमतेने आणि पूर्ण क्षमतेने लोकांना सेवा देण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न माध्यमांच्या लक्षात आणून द्यावेत अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. प्रयागराज जंक्शनसह प्रयागराज छीवकी, नैनी, सुभेदारगंज, प्रयाग, फाफामौ, प्रयागराज रामबाग आणि झुशी ही इतर 7 स्थानके पूर्णपणे कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले. भाविकांना महाकुंभ मेळ्याच्या शहरात पोहोचण्यासाठी, रेल्वेने केलेल्या भगीरथ प्रयत्नांवर प्रकाश टाकावा, असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमे, भारतीय रेल्वेच्या जनसंपर्क क्षेत्रीय आणि विभागीय कार्यालयांना केले.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी सर्व रेल्वे स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त होत असलेल्या रेल्वे भवनच्या वॉर रूममध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी  वैष्णव यांना प्रयागराज परिसरातील रेल्वे सेवांच्या सुरळीत कामकाजाची माहिती दिली.

प्रवाशांनी अद्यतनीत माहिती मिळवण्यासाठी अधिकृत रेल्वे स्रोतांचा उपयोग करण्याचा आणि दिशाभूल करणारी माहिती टाळण्याचा सल्ला रेल्वे विभागाने दिला आहे.