Connect with us

गोवा खबर

हुतात्म्यांना आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत आज पणजी येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

वीज मंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, डीजीपी आलोक कुमार, आयपीएस, आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई, आयपीएस, गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास रघुनाथ नाईक देसाई व इतर मान्यवरांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यभरातील स्वातंत्र्यसैनिक आणि विद्यार्थीही उपस्थित होते.

आदराचे प्रतीक म्हणून, सशस्त्र दलाच्या जवानांनी लास्ट पोस्टची धुन आळविली. हुतात्म्यांच्या बलिदानाला आदरांजली म्हणून यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली.

हुतात्मा दिवस पाळणे ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्वांना आदरांजली आहे.