गोवा खबर : उद्योग व वाणिज्य मंत्री माविन गुदिन्हो यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला. महिला समाजात आर्थिक सुरक्षितता मिळवण्याबरोबरच रोजगार निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षमपणे चालविण्यास मदत करू शकतात. असे ते म्हणाले.
शहरात उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयातर्फे आयोजित ‘रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
गुदिन्हो यांनी ६६ हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात नोंदणी झालेली आहे ज्यात फक्त १६०० महिला उद्योजकांचा समावेश असल्याचे सांगितले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील महिलांची संख्या वाढली पाहिजे आणि त्यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल असे ते म्हणाले. जर आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेत वाढ साधायची असेल तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी रोजगार निर्मितीसाठी गंभीर प्रयत्न करावे लागतील ज्यामध्ये ‘रेझिंग अँड एक्सेलरेटिंग परफॉर्मन्स उपक्रम सुरू केल्याने राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल असे मंत्री म्हणाले.
गोवा विविध उत्पादनांसाठी प्रसिध्द असून उत्पादनांना जीआय टॅग असले तरीही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित करता येते असे त्यांनी सांगितले. गोव्यात विविध प्रकारचे अस्सल आणि पारंपारिक खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत ज्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रक्रिया आणि विक्री करू शकते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या लोकांना शक्य तितके सहाय्य आणि मदत देण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संबंधित खाते आणि संस्थेच्या सक्रिय भूमिकेवरही मंत्र्यांनी भर दिला.
एमएसएमई मंत्रालयाचे संयुक्त सचिव अतीश कुमार सिंह यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी एमएसएमई मंत्रालयाने राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी ‘रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई कार्यक्रम आणि त्याची उद्दिष्टे विषद केली.
भारत सरकारने जागतिक बँक-समर्थित केंद्रीय क्षेत्र योजना म्हणजे `रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स सुरू केली आहे. उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय ही गोव्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी आहे असे ते म्हणाले.
एमएसएमई मंत्रालयाचे संचालक विनम्र मिश्रा यांनी आपल्या भाषणात राज्यातील एमएसएमईसाठी झेड प्रमाणपत्राची गरज व्यक्त केली ज्यामुळे सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे फायदे मिळतील असे ते म्हणाले.
एमएसएमई मंत्रालयाचे संचालक अंकिता पांडे यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी ‘रेझिंग अँड एक्सेलरेटिंग परफॉर्मन्स कार्यक्रमाच्या विविध फायद्यांविषयी हाती घेतलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
उद्योग व वाणिज्य सचिव सुनील अंचिपाका, आयएएस यांनी यावेळी बोलताना राज्यातील एमएसएमईच्या वाढीसाठी राज्य सरकारच्या चालू असलेल्या वचनबद्धतेबद्दल माहिती दिली. त्यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले. पीएमएफएमई योजनेखालील रील मेकिंग स्पर्धेच्या उच्च माध्यमिक शाळेच्या विध्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. उध्योग आणि वाणिज्य खात्याचे संचालक आश्विन चंद्र ए, आयएएस यांनी आभार मानले. नियोजन अधिकारी गीता जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.