Connect with us

गोवा खबर

… ही तर लोकशाहीची थट्टा: युरी आलेमाव

Published

on

Spread the love
गोवा खबर : विधानसभेचे अधिवेशन दोन दिवसांसाठी बोलावणे म्हणजे लोकशाहीची थट्टा तर आहेच, पण भाजप महत्त्वाच्या मुद्द्यांना सामोरे जाण्यास घाबरत आहे आणि लोकशाही तत्त्वांना आणखी कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारवर केली.
‘‘विरोधकांच्या अधिकारांवर गदा आणण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयाचा मी निषेध करतो.  अर्थपूर्ण चर्चा करून जनतेच्या भल्यासाठी काम करण्याऐवजी, भाजप विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा आरोप आलेमाव यांनी केला.
नोकर भरतीवरून सुरू असलेला वाद, सिद्दीकी प्रकरण, ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प, पर्यटनातील घसरण अशा राज्याला भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन अपुरे आहे. ह्या सर्व  महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे,’’ असे ते म्हणाले.
‘‘भाजपचा स्वत:वरचा विश्वास उडाला आहे आणि जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे, हेही त्यांना ठाऊक आहे. यामुळे ते गोंधळलेले आहेत आणि विरोधाला सामोरे जाण्यास घाबरतात. त्यांनी म्हादई कर्नाटकला कशी विकली आणि भ्रष्टाचारातून संपत्ती कशी जमवली हे गोव्यातील जनता विसरलेली नाही. आम्ही त्यांना या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करू देणार नाही,’’ असे आलेमाव म्हणाले.