Connect with us

गोवा खबर

राजभवनात आसाम आणि नागालँडचा स्थापना दिवस साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : दोना पावला येथील राजभवनातील दरबार सभागृहात राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत आसाम आणि नागालँड राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. “विविधतेत एकता” या संकल्पनेवर प्रकाश टाकणाऱ्या या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी ईशान्येकडील राज्याच्या सहकार्याशिवाय भारताची प्रगती अपूर्ण असल्याचे सांगून देशाच्या विकासात दोन्ही राज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन केले.

राज्यपाल पिल्लई यांनी त्यांच्या आगामी पुस्तकाबद्दल माहिती देताना पुस्तक इंग्रजीतून आसामीमध्ये अनुवादित केले असून लवकरच आसाममध्ये त्याचा शुभारंभ केला जाईल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात राज्यपालांचे सचिव एमआरएम राव, आयएएस यांच्या स्वागतपर भाषणाने झाली.  विविधतेतील एकता” हीच देशाची ताकद आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आसाम सोसायटी गोवाचे अध्यक्ष दीपक मेधी यांनी आसामचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारश्याची माहिती दिली. नागालँड असोसिएशन गोवाचे अध्यक्ष आलो खिंग यांनी नागालँड असोसिएशन ऑफ गोवा लोकांच्या कल्याणासाठी आणि भल्यासाठी असलेल्या बांधिल असल्याचे सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किम हँगसिंग यांनी केले तर संदेश गडकरी यांनी आभार मानले.