Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी लोकांना दिवाळीच्या शुभ आणि आनंदी प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. जात, पाथ आणि धर्म बाजुला सारून भारतीय लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने त्यांच्या घरी दिवे लावून हा सण साजरा करतात. दिवाळी सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजयाचे प्रतिक आहे. दिवाळीच्या काळात देशभऱ दिव्यांचा लखलखाट केला जातो.

दिवाळी सण आध्यात्मिकदृष्ट्या अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा, वाईटावर चांगल्याचा आणि निराशेवर आशेचा विजय दर्शविते. मला असे म्हणायचे आहे की दिवाळीसारख्या सणांची आपल्या जीवनात मोठी भूमिका आहे. भारत हा विविध धर्म, प्रदेश आणि भाषा असलेला देश आहे. या उत्सवामुळे लोकांमध्ये सामाजिक एकता, परस्पर विश्वास आणि सद्भावना वाढण्यास मदत होते, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि एकता मजबूत होते.

दिवाळीचा सण सर्वांना आनंद आणि समृद्धी घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.