Connect with us

गोवा खबर

बाल भवन परीक्षा केंद्राच्या संगीत परीक्षांचे वेळापत्रक

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजी पत्रक अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने 727 संगीत परीक्षा केंद्रावर नोव्हें/ डिसें.२०२४ सत्रातील गायन वादन व नृत्य विषयाच्या संगीत प्रवेशिका पूर्ण ते मध्यमा पूर्ण पर्यंतच्या लेखी परीक्षा रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून बालभवन कांपाल पणजी येथे घेण्यात येणार आहेत.

सकाळी ९ ते दुपारी १२  या वेळेत गायन वादन व कथक नृत्याच्या लेखी परीक्षा घेण्यात येतील तर दुपारच्या सत्रात २ ते ५  या वेळेत तबला/पखवाज व भरतनाट्यम विषयाच्या लेखी परीक्षा बालभवन पणजी येथे घेण्यात येतील तसेच गायन वादन व तबला विषयाच्या प्रारंभिक व प्रवेशिका प्रथमच्या  प्रात्यक्षिक परीक्षा ९ , १०  व ११ नोव्हेंबर २०२४  रोजी सकाळी  ९ ते सायं. ६ या वेळेत घेण्यात येणार आहे.

तरी संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी हजर राहावे, अधिक माहितीसाठी बालपण कार्यालयात प्रत्यक्ष २२२६८२३  या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, प्रवेशिका पूर्ण ते मध्यम पूर्ण विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक तसेच  कथ्थ्‍क व   भरतनाट्‌यम  विषयाच्या प्रारंभिक ते मध्यमापुर्ण पर्यंतच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक मागाहून कळवण्यात येईल, असे बालभवन चे संचालक व केंद्र व्यवस्थापक शशिकांत पुनाजी यांनी यांनी कळवले आहे.