- “कंट्री ऑफ फोकस” म्हणून ऑस्ट्रेलियाची निवड
- ऑस्ट्रेलिया-भारत सह-निर्मिती पॅनल ‘फिल्म बझार’ मध्ये सहकार्याच्या संधी शोधणार
- अकादमी पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सील यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर क्लासचे आयोजन
गोवा खबर : 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ऑस्ट्रेलियाला “कंट्री ऑफ फोकस” म्हणून नामांकन मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियन चित्रपटांच्या जागतिक चित्रपट उद्योगातील प्रभावशाली योगदानाचा उत्सव साजरा करणे, त्याची कथा कथनाची समृद्ध परंपरा, गतिशील चित्रपट संस्कृती आणि नवोन्मेषी सिनेमॅटिक तंत्रांवर प्रकाश टाकणे, हे या विशेष सन्मानाचे उद्दिष्ट आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे यापूर्वीच ऑडिओ व्हिज्युअल (दृक-श्राव्य) सह-उत्पादन कराराचे सदस्य आहेत.
