गोवा खबर : स्वर – गंधा मांद्रे या संस्थेची वार्षिक पेडणे तालुका स्तरीय आकाश कंदील स्पर्धा ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा सातेरी देवस्थान मराठवाडा मांद्रेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेची सविस्तर माहिती खालीप्रमाणे आहे.
१. स्पर्धा शालेय मुले, युवक- युवती व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली आहे.
२. स्पर्धेतील आकाश कंदील बांबू,गवत, सुतळ किंवा अन्य नैसर्गिक वस्तूपासून स्वतः पारंपरिक पद्धतीने तयार केलेले असावेत.
३. प्लास्टिक, थर्माकोल, पत्रा वापरून तयार केलेले आकाश कंदील स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत.
४. स्पर्धकांची कल्पकता, रंगसंगती, पारंपरिकता यांना विशेष महत्त्व राहील.
५. प्रवेश शुल्क रुपये ५० असेल.
६. स्पर्धकांनी स्वतःचा बल्ब आणावा.
७. स्पर्धकांनी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मोबा. क्र. ९४२३०६२४४२ किंवा ९४२११५११५९ वर कॉल किंवा मेसेज पाठवून आपली नावनोंदणी करावी.
* स्पर्धेची बक्षिसे
– प्रथम : रू ५०००
– दुसरे: रू ४०००
– तिसरे: रू ३०००
– उत्तेजनार्थ रुपये १००० ( एकूण दोन बक्षिसे)
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात मांद्रेचे सरपंच मिंगेल फर्नांडिस , पंचसदस्य अमित सावंत , संपदा असगावकर, समाज सेवक सचिन परब, स्वरगंधा अध्यक्षा संगीता परब , तसेच सातेरी देवस्थान पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.