गोवा खबर : दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील मोरपिर्ला ग्रामपंचायतीचा वार्ड-६ आणि सासष्टी तालुक्यातील ओर्ली ग्रामपंचायतीचा वार्ड-७ साठी २० ऑक्टोबर २०२४ रोजी पोटनिवडणूक होणार असून वित्त खात्याने (महसूल आणि नियंत्रण) पोटनिवडणूक होणाऱ्या वार्डांतील दारू विक्री आस्थापने, दुकांने, बार १९, २० आणि २१ ऑक्टोबर २०२४ रोजी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

तसेच वरील दिवसांनी पोटनिवडणूक होणार असलेल्या वार्डांमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यासह बियर सोडून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची किंवा विदेशी दारूची पाऊण बाटलीआणि ६५० एमएलच्या सहा बियरच्या बाटल्या आणि देशी दारूची पाऊण बाटली एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतील किंवा जवळ बाळगू शकतात.
बार आणि रेस्टोरंट परवाना असलेल्या आस्थापनांना केवल खाण्याचे जिन्नस विकण्यास मिळेल आणि अशी सुचना देणारे फलक लावावे लागतील. बार काऊंटर बंद ठेवावा लागेल आणि वरील दिवसांनी दारू विक्री करण्यास मनाई असेल.