गोवा खबर : वाहतूक पोलिस राज्यात येणार्या पर्यटकांना टार्गेट करून त्यांना लुटत आहेत. कारवाईच्या नावाखाली त्यांच्याकडून ‘तालांव’ घेतला जात असून, हे प्रकार थांबायला हवेत, अशी मागणी बार्देश तालुक्यातील तीन आमदारांनी डीजीपी अलोक कुमार यांच्याकडे गुरुवारी केली.
आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो आणि केदार नाईक यांनी पोलिस महासंचालकांची भेट घेऊन वाहतूक पोलिसांकडून पर्यटकांची सुरू असलेली लूट थांबवण्याची मागणी केली.
कळंगुट आणि शिवोली मतदारसंघात वाहतूक पोलिसांकडून पर्यटकांना लुटण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पोलिस महासंचालकांनी या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे सांगितले.