Connect with us

गोवा खबर

इंडिया आघाडीशिवाय काँग्रेस भाजपला पराभूत करणे अशक्य : पालेकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष बळकट करून भाजपच्या विरोधात लढणार. मुख्यमंत्री इंडिया आघाडीला घाबरत आहेत, हे अमित पाटकर यांचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या स्क्रीप्टचा भाग वाटतो. इंडिया आघाडीशिवाय काँग्रेस भाजपला पराभूत करू शकत नाही. तशी वेळ आली तर आम्ही तिसरी आघाडीही करायला तयार आहे, असा दावा ’आप’चे संयोजक अ‍ॅड. अमित पालेकर यांनी गुरुवारी केला.

भाजपचा येत्या निवडणुकीत पराभव करायचा असेल तर इंडिया आघाडीची गरज आहे, असे मत पालेकर यांनी व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात इंडिया आघाडीने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे इंडिया आघाडी विरोधी पक्षनेते तसेच दिल्लीतील नेत्यांनाही हवी आहे, असे पालेकर म्हणाले.