Connect with us

गोवा खबर

आग्वाद सॅण्ड बार वाहतुकीस खुला

Published

on

Spread the love

गोवा खबर : बंदर कप्तान खात्याने आग्वाद जल वाहतूक मार्ग १६ सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुला केल्याचे जाहीर केले आहे. तसेच कांपाल, तेजो फ्रंट, तेजो रिअर, रेईश मांगूश, पेन्ह-द-फ्रांस आणि आग्वादचे दीपगृह चालू केले आहे.

बंदर कप्तान खात्याच्या पुर्व परवानगीशिवाय कुंभारजुवा कॅनलातून बाणस्तारी पुलाखालून वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.

नाविकांनी मांडवी आणि जुवारी पुलांखालून वाहतूक करताना अधिक खबरदारी घ्यावी आणि इतर सुचनांचे पालन करावे. पुलापासून दोन्ही बाजुने ५०० मीटर भागात ओव्हरटेक करण्यास मनाई आहे.

धावजी येथे नव्या कोंकण रेल्वे पुलाखालून वाहतूक करताना जहाजानी खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच नाविकांनी फक्त भरतीच्या वेळी आग्वाद सॅण्ड बार पट्ट्यातून खबरदारी घेवून वाहतूक करावी, असे बंदर कप्तान खात्याने कळविले आहे.